Pomegranate Production : देशात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन (Pomegranate Production) होते. देशातील फक्त चार राज्यातच 95 टक्के डाळिंबाचे उत्पादन होते. पण देशातील कोणत्या राज्यात डाळिंबाचे सर्वाधिक उत्पादन होते? याबाबतची माहिती तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.  


एकूण डाळिंब उत्पादनात महाराष्ट्र  (Maharashtra) आघाडीवर


आरोग्याच्या दृष्टीनं डाळिंब (Pomegranate) हे पिक खूप महत्वाचे आहे. डाळिंबाचे अनेक फायदे आहेत. डाळिंबात अनेक पोषक घटक आढळतात. त्यात जीवनसत्त्वे, फायबर, लोह, पोटॅशियम आणि झिंक आढळतात. या कारणांमुळे वर्षभर बाजारात डाळिंबाची मागणी कायम राहते. भारतात सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादन महाराष्ट्रात होते. म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील शेतकरी दरवर्षी डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. देशातील एकूण डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा हा 54.85 टक्के आहे.


कोणत्या राज्याचा डाळिंब उत्पादनात कितवा क्रमाकं? 


डाळिंब हे एक असे फळ आहे की जे प्रत्येक ऋतूत खाल्ले जाते. डाळिंब हे फळ आरोग्यासाठी आणि कमाई या दोन्हीसाठी खूप फायदेशीर आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये (Gujarat) डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. येथील शेतकरी 21. 28 टक्के डाळिंबाचे उत्पादन घेतात. डाळिंब हे असे बागायती पीक आहे की, ते एकदा लावले की अनेक वर्षे फळे देत राहते. तसेच त्याची रोपे लावण्यासाठी योग्य वेळ म्हणजे ऑगस्ट किंवा फेब्रुवारी ते मार्च. उत्पादनाच्या बाबतीत, भारतातील पहिल्या तीन राज्यांमध्ये कर्नाटक (Karnataka)  तिसऱ्या क्रमांकावर आहे. इथं 9.51 टक्के डाळिंबाचे उत्पादन होते. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या (2022-23) आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेश डाळिंबाच्या उत्पादनात चौथ्या स्थानावर आहे. दरवर्षी येथील शेतकरी 8.82 टक्के डाळिंबाचे उत्पादन घेतात. या चार राज्यांमध्ये मिळून 95 टक्के डाळिंबाचे उत्पादन होते.


डाळिंब खाण्याचे अनेक फायदे


संशोधनानुसार, दररोज डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळं दीर्घकालीन आजार, कर्करोग आणि अनेक हृदयविकारांची शक्यता कमी होण्यास मदत होईल. त्याशिवाय, तुम्ही सहनशक्ती वाढवण्याची, स्नायूंची जलद पुनर्प्राप्ती, किडनी स्टोनपासून बचाव आणि उत्तम पचनसंस्था निर्माण करण्याची अपेक्षा देखील करू शकता. डाळिंबात अँथोसायनिन्स, टॅनिन आणि प्युनिकलागिन सारख्या शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक जळजळ कमी करण्यासाठी आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या टाळण्यासाठी शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स म्हणून ओळखले जातात.


महत्त्वाच्या बातम्या:


'या' राज्यात जलसंकट, शेतकऱ्यांनी 1,74,000 एकर जमिनीवर भातशेती सोडली, भूजल पातळीत मोठी घट