Railway Jobs : देशातील सरकारी नोकऱ्यांसाठी (Govt Job) तयारी करणाऱ्या करोडो तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. जास्तीत जास्त रिक्त पदे भरता यावी आणि लोकांना रोजगार मिळावा यासाठी दरवर्षी नियमितपणे भरती करण्याचे नियोजन असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने गेल्या वर्षी दीड लाख पदांची भरती केली होती. दरम्यान, यावर्षी देखील 5,696 असिस्टंट लोको पायलटची भरती केली जाणार आहे.


5696 ALP ची भरती केली जाणार


रेल्वेने एक नवीन भरती प्रक्रिया सुरू केली आहे, जी दरवर्षी नियमितपणे भरती केली जाते. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाचा सातत्याने विस्तार होत आहे. त्यामुळं वार्षिक आधारावर अनेक श्रेणींमध्ये भरती केली जात आहे. दरम्यान, सध्या 5,696 ALP (असिस्टंट लोको पायलट) ची भरती 20 जानेवारीपासून सुरु झाली आहे. यामध्ये अर्जदारांना दरवर्षी भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. रेल्वेतील नोकऱ्यांसाठी या भरती दरवर्षी होत असल्याने, काही कारणास्तव या वर्षी उमेदवार यशस्वी झाले नाहीत, तर ते पुढील वर्षी पुन्हा हजर राहू शकतात.


दरवर्षी रिक्त जागांवर भरती केली जाणार


पूर्वी रेल्वे 3 ते 4 वर्षांतून एकदा भरती करत असे, आता रेल्वे दरवर्षी रिक्त पदांवर भरती करणार असल्याची माहिती अनिल कुमार खंडेलवाल यांनी दिली. आतापर्यंत, 5,696 लोको पायलटच्या भरतीसंदर्भातील पहिली अधिसूचना 20 जानेवारी रोजी जारी करण्यात आली आहे. रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना आता पूर्वीपेक्षा अधिक संधी मिळणार आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Indian Army Job 2024 : लष्करात नोकरीची सुवर्णसंधी, आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती