एक्स्प्लोर

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात चौपट वाढ करण्याची मागणी, काय निर्णय होणार? 

8th Pay Commission News : 8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा रंगत असून कर्मचारी संघटनांनी किमान वेतन 50 ते 72 हजार रुपये करण्याची आणि फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली आहे.

8th Pay Commission News Update : देशभरात 8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा वेग घेताना दिसत आहे. विविध कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारकडे वेतन, भत्ते आणि इतर सुविधांमध्ये मोठे बदल करण्याच्या मागण्या केल्या आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.

8th Pay Commission Salary Structure Change : वेतन संरचनेत मोठ्या बदलाची मागणी

केंद्रशासित प्रदेशातील शिक्षकांच्या ‘प्रगतिशील शिक्षक न्याय मंच’ (PSNM) या संघटनेने वेतन आणि भत्त्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. लेवल 1 कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 50,000 ते 60,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

Fitment Factor Demand 8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा प्रस्ताव

सध्या 2.57 असलेला फिटमेंट फॅक्टर 2.62 ते 3.83 दरम्यान वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच वार्षिक वाढ 3 टक्क्यांवरून 6 ते 7 टक्क्यांपर्यंत करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

Four Times Salary Hike : वेतन 4 पट वाढवण्याची मागणी

भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ (BPMS) ने किमान बेसिक वेतन 72,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. ही रक्कम सध्याच्या वेतनाच्या जवळपास चारपट आहे. तसेच फिटमेंट फॅक्टर 4 करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे.

High Salary Proposal : उच्च पदांसाठी मोठे वेतन

टॉप लेव्हल पदांसाठी कमाल वेतन 10 लाख रुपये करण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. हे सर्व प्रस्ताव मंजूर झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. महागाईच्या पार्श्वभूमीवर हे बदल आवश्यक असल्याचे संघटनांचे मत आहे. मात्र, केंद्र सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What Is Fitment Factor : फिटमेंट फॅक्टरमुळे पगारात वाढ नेमकी कशी होते?

वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर लक्षात घेतला जातो. त्या आधारेच कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन ठरवले जाते. फिटमेंट फॅक्टर हे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर (Basic Pay) लागू होते. त्यामध्ये महागाई, आर्थिक स्थिती आणि सरकारची आर्थिक क्षमता या गोष्टी लक्षात घेतल्या जातात.

सातव्या वेतन आयोगानुसार, हा फिटमेंट फॅक्टर हा 2.57 टक्के इतका होता. आठव्या वेतन आयोगानुसार, हा फिटमेंट फॅक्टर 2.86 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मूळ वेतनात मोठी वाढ होऊन कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारातही वाढ होणार आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
Embed widget