एक्स्प्लोर

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किमान वेतन  69000 रुपये करा, वार्षिक 6 टक्के पगारवाढ हवी, कोणी केली मागणी जाणून घ्या

8th Pay Commission News: कामगार संघटनांनी आठव्या वेतन आयोगाकडे त्यांचं अंतिम निवेदन सोपवलं आहे. त्यानुसार किमान वेतन 18000 रुपयांवरुन 69000 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

8th Pay Commissionनवी दिल्ली : आठव्या वेतन आयोगासंदर्भातील घडामोडी वाढल्या आहेत. आठव्या वेतन आयोगाकडून त्यांच्या वेबसाईटवर विविध शहरात स्टेक होल्डर्ससोबत चर्चेसंदर्भातील वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. वेतन आयोगाकडून दिल्ली, पुणे, डेहराडून या सारख्या शहरांमध्ये बैठका आयोजित केल्या जात आहेत. एका कामगार संघटनेकडून आठव्या वेतन आयोगात किमान वेतन 69000 रुपये करावं अशी मागणी केली आहे. 

नॅशनल काऊन्सिल- ज्वॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीच्या कर्मचाऱ्यांनी 14 एप्रिलला 51 पानांचं निवेदन आयोगाला सोपवलं. त्यानुसार किमान वेतन 18 हजारांवरुन 69 हजार रुपये करण्याची मागणी केली आहे. वार्षिक वेतनवाढ देखील 3 टक्क्यांवरुन वाढवून 6 टक्के करण्याची मागणी केली आहे. सीएनबीसी टीव्ही -18 च्या रिपोर्टनुसार फिटमेंट फॅक्टर 3.83 असावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. 

18000 रुपयांमध्ये खर्च भागवणं अवघड

कामगार संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्यासाठी आधार 5 सदस्यांचं कुटुंब लक्षात घेत दिला आहे. सध्याच्या सीपीआयनुसार 18 हजार रुपयात आता एका कुटुंबाचा मुलभूत गरजा भागवू शकत नाही. शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा खर्च वाढला आहे. यामुळं फिटमेंट फॅक्टर 3.83 ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

आठव्या वेतन आयोगानुसार पगार कधी मिळणार?

केंद्र सरकारनं दिल्ली विधानसभा निवडणुकीअगोदर आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. त्यानंतर 3 नोव्हेंबर 2025 ला आयोगाची स्थापना करण्यात आली. आठव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 1 जानेवारी 2026 पासून सुरु होईल. आठव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ आणि फरक 2027 च्या सुरुवातीला दिला जाऊ शकतो.

कामगार संघटनांच्या इतर मागण्या  

कामगार संघटनांच्या इतर मागण्यांपैकी प्रमुख मागणी घरभाडे भत्ता स्लॅब वाढवून मोठ्या शहरात 30, 35 आणि 40 टक्के करावा अशी आहे. याचा फायदा कमी पगार असणाऱ्या व्यक्तीला देखील घरभाडे स्वरुपात मिळेल. याशिवाय कामगार संघटनांची मागणी जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि पेन्शनची रक्कम शेवटच्या पगाराच्या मूळ वेतनाच्या 67 टक्के असावी अशी आहे. सध्या मूळ वेतनाच्या 50 टक्के पेन्शन मिळते. 

दरम्यान, 8  व्या वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 ला जारी करण्यात आलेल्या राजपत्र नोटिफिकेशन द्वारे करण्यात आली आहे. यामध्ये तीन सदस्य असून  माजी न्यायमूर्ती रंजना देसाई या अध्यक्षा आहेत. प्रा. पुलक घोष अर्धवेळ सदस्य तर पंकज जैन सदस्य सचिव आहेत.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

CNG Price Hike: मुंबईकरांना पुन्हा महागाईचा झटका! CNG दरात 1 रुपयांनी वाढ; पाच महिन्यांत तब्बल 8 रुपये महागला, आता दर किती?
मुंबईकरांना पुन्हा महागाईचा झटका! CNG दरात 1 रुपयांनी वाढ; पाच महिन्यांत तब्बल 8 रुपये महागला, आता दर किती?
मोठी बातमी! साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
मोठी बातमी! साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
कामाचा ताण, सुट्ट्यांचा अभाव! तब्बल 2 लाखांचा बॉण्ड भरुन तरुणीने सोडली 12 तासांची नोकरी, नेमकं प्रकरण काय?
कामाचा ताण, सुट्ट्यांचा अभाव! तब्बल 2 लाखांचा बॉण्ड भरुन तरुणीने सोडली 12 तासांची नोकरी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar:बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळली गेली, डॉक्टरांनी सीझर सांगितलं, सासरच्या मंडळींच्या आडमुठेपणामुळे 9 महिन्याच्या गर्भवतीचा अंत, बाळही दगावलं, संभाजीनगर सुन्न
शॉकींग! उपचाराच्या खर्चावरुन सासरच्यांचा आडमुठेपणा भोवला; 9 महिन्याच्या गर्भवतीचा अंत, बाळही दगावलं
मॅक्सीत फिरणारी बाई कुठल्या कुठे पोहोचली, मीनाक्षी शिंदेंवर जयनाथ पूर्णेकरांचा हल्ला, म्हणाले, मी पण नगरसेवक होतो, पण...
मॅक्सीत फिरणारी बाई कुठल्या कुठे पोहोचली, मीनाक्षी शिंदेंवर जयनाथ पूर्णेकरांचा हल्ला, म्हणाले, मी पण नगरसेवक होतो, पण...
Actor Dino Morea Arrested: बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक, राहत्या घरातच मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या, नेमकं घडलंय काय?
बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला अटक, राहत्या घरातच मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Meenakshi Shinde: ...मग तुम्ही रश्मी ठाकरेंचे खासमखास म्हणायचं का? आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलणार नाही, मीनाक्षी शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
...मग तुम्ही रश्मी ठाकरेंचे खासमखास म्हणायचं का? आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलणार नाही, मीनाक्षी शिंदेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
Pradeep Purnekar Death Case: मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, प्रदीप पुर्णेकर प्रकरण अत्यंत दुर्दैवी, दिशा सालियन प्रकरणात माझ्याकडे FIR कॉपी, त्यामध्ये 6 वेळा आदित्य ठाकरे आणि 4-5 वेळा उद्धव ठाकरेंचं नाव
प्रदीप पुर्णेकर प्रकरण अत्यंत दुर्दैवी, दिशा सालियन प्रकरणात माझ्याकडे FIR कॉपी, त्यामध्ये 6 वेळा आदित्य ठाकरे आणि 4-5 वेळा उद्धव ठाकरेंचं नाव: मीनाक्षी शिंदे
PM Modi on Captain Smith Machhar: '140 करोड भारतीयांचा सन्मान उंचावला'; पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद, शौर्याची तोंडभरुन केलं कौतुक
'140 करोड भारतीयांचा सन्मान उंचावला'; पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद, शौर्याची तोंडभरुन केलं कौतुक
Meenakshi Shinde on Pradeep Purnekar death Case: तुम्ही प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी का गेला नाहीत? मिनाक्षी शिंदे म्हणाल्या जायची इच्छा असली तरी....
तुम्ही प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी का गेला नाहीत? मिनाक्षी शिंदे म्हणाल्या जायची इच्छा असली तरी....
Abhijeet Dipke CJP Protest : चला चहा घेऊ, पोलिसांची अभिजीत दिपकेंना ऑफर, मग स्टेशनला नेऊन काय केलं?
चला चहा घेऊ, पोलिसांची अभिजीत दिपकेंना ऑफर, मग स्टेशनला नेऊन काय केलं?
Embed widget