एक्स्प्लोर

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्त्यात होणार वाढ, नेमकी किती वाढ होणार? 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (dearness allowance) वाढणार आहे.

7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (dearness allowance) वाढणार आहे. लेबर ब्युरोने AICPI निर्देशांकाची मे पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये महागाई भत्त्याबाबतची माहिती दिली आहे. आता जूनचे आकडे जाहीर होणार आहेत. हे आकडे 31 जुलैला येणार होते, मात्र त्याला थोडा विलंब झाला आहे. महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सध्या महागाई भत्ता 53 टक्क्यांच्या जवळ

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार याचीच सर्वांना उत्सुकता आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा 3 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांत पहिल्यांदाच 3 टक्के वाढ होणार आहे. गेल्या चार वेळा महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. लेबर ब्युरोने महागाई भत्ता ठरवणाऱ्या AICPI निर्देशांकाची मे पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. आता जूनचे आकडे जाहीर होणार आहेत. हे आकडे 31 जुलैपर्यंत जाहीर  होणार होते. मात्र त्याला विलंब झाला आहे. मात्र, सध्याचा ट्रेंड पाहिल्यास महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या महागाई भत्ता 53 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे.

AICPI निर्देशांक क्रमांक काय आहे?

महागाई भत्ता किती वाढू शकतो हे AICPI निर्देशांकातील आकडे ठरवतात. जानेवारी ते जून 2024 दरम्यान मिळालेल्या आकड्यांच्या आधारे जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता मिळेल हे ठरवले जाईल. आतापर्यंत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे आकडे आले आहेत. आत्तापर्यंत 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. आता नवीन महागाई भत्ता जुलैपासून लागू होणार आहे. जानेवारीमध्ये, निर्देशांक क्रमांक 138.9 अंकांवर होता, ज्यामुळे महागाई भत्ता 50.84 टक्क्यांवर पोहोचला. यानंतर, फेब्रुवारीमध्ये निर्देशांक 139.2 अंकांवर, मार्चमध्ये 138.9 अंकांवर, एप्रिलमध्ये 139.4 अंकांवर आणि मेमध्ये 139.9 अंकांवर राहिला. या धर्तीवर एप्रिलमध्ये महागाई भत्ता 51.44 टक्के, 51.95 टक्के, 52.43 टक्के आणि मे महिन्यात 52.91 टक्के झाला आहे.

तज्ज्ञांच्या मते महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ होणार

दरम्यान, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्यात केवळ 3 टक्क्यांची वाढ होणार आहे.  निर्देशांकानुसार, मे पर्यंत महागाई भत्ता 52.91 टक्के आहे. जूनचा आकडा अजून यायचा आहे. जूनमध्ये निर्देशांक 0.7 अंकांनीही वाढला तर तो 53.29 टक्क्यांवर पोहोचेल. 4 टक्क्यांच्या वाढीसह निर्देशांक 143 अंकांपर्यंत पोहोचेल. जे अशक्य दिसते. निर्देशांकात इतकी मोठी वाढ होणार नाही. त्यामुळे यावेळी कर्मचाऱ्यांना केवळ 3 टक्क्यांवर समाधान मानावे लागणार आहे.

महागाई भत्ता 1 जुलैपासूनच लागू होणार

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए वाढ) पुढील सुधारणा 1 जुलैपासूनच लागू होईल. परंतु, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत त्याची घोषणा होऊ शकते. कामगार ब्युरो आपला डेटा वित्त मंत्रालयाकडे सादर करेल आणि वित्त मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, त्याला मंत्रिमंडळाची मान्यता दिली जाईल. साधारणपणे, जुलैपासून लागू होणारा महागाई भत्ता सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला जाहीर केला जातो. सप्टेंबरमध्ये घोषणा झाल्यास, कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्टची थकबाकी मिळेल आणि त्याच महिन्याच्या पगारात दिला जाईल. 

महत्वाच्या बातम्या:

केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याला मंत्रीमंडळाची मंजुरी

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Price : सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे भाव वाढले; 'इतक्या' रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Rates: अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
Karj Mafi : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी दोन महत्त्वाची कामं करावी लागणार 
कर्जमाफीची 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी,आधार प्रमाणीकरण करावं लागणार
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता शिक्षण संस्थांकडे; अमरावतीत विद्यापीठ अन् इंजिनिअरींग कॉलेजचे कँटीन सील
Ajinkya Rahane: 'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
'संघात निवडीची असलेली चिंता, ती न संपणारी बॅग भरणे आणि परत रिकामी करणे, तुझा संयम अन्..' पत्नी राधिकाची अजिंक्यसाठी भावस्पर्शी पोस्ट
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
तानाजी सावंतांनी फोन केला, तरीही शिक्षक मिळेना; शाळेतील विद्यार्थी थेट जिल्हा परिषदेत, ग्रामस्थांसह आंदोलन
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
Embed widget