एक्स्प्लोर

विवा मनीने महाराष्ट्रात 17,000 हून अधिक ग्राहकांचा टप्पा गाठला

विवा मनीने महाराष्ट्रात 17,000 हून अधिक ग्राहकांचा टप्पा गाठत ₹240 कोटींपेक्षा अधिक कर्जवाटप केले आहे. राज्यातील मजबूत मागणीमुळे कंपनीच्या डिजिटल कर्ज व्यवसायाला वेग मिळाला आहे.

विवा मनी, या डिजिटल कर्जपुरवठा प्लॅटफॉर्मने जून 2024 मध्ये महाराष्ट्रात आपले लेंडिंग अॅप सुरू केल्यानंतर राज्यात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे कंपनीच्या कर्जवाटप व्यवसायात सातत्याने वाढ झाली असून, महाराष्ट्रातील तिची उपस्थिती अधिक मजबूत झाली आहे.

गेल्या दोन वर्षांत विवा मनीने महाराष्ट्रभर 18,000 हून अधिक कर्जांचे वितरण केले असून, ज्यांचे एकूण मूल्य ₹240 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सध्या कंपनी महाराष्ट्रातील 17,000 हून अधिक ग्राहकांना सेवा पुरवत असून, यामुळे राज्यातील तिचा वाढता ग्राहकवर्ग आणि सातत्यपूर्ण विस्तार अधोरेखित होतो.

याबाबत विवा मनीचे संस्थापक जॉर्ज डोन्चेन्को म्हणाले, " विवा मनी ज्या राज्यांमध्ये कार्यरत आहे, त्यापैकी महाराष्ट्रात ग्राहकांचा कर्ज घेण्याकडे वळण्याचा दर अधिक आहे. येथे आम्हाला मजबूत मागणी दिसून येत आहे. सध्या कंपनीच्या एकूण कर्जांपैकी 35 टक्के कर्जे महाराष्ट्रातून दिली जातात."

या यशामागे महाराष्ट्राची विविधांगी अर्थव्यवस्था हेही एक महत्त्वाचे कारण असल्याचे कंपनीचे मत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे 20 टक्के योगदान देते.

डोन्चेन्को म्हणाले, "आमच्या बहुतांश ग्राहकांचा आधार मुंबई आहे. जवळपास 2 कोटी लोकसंख्या आणि विकसित डिजिटल अर्थव्यवस्था असलेले हे शहर आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे."

महाराष्ट्रात सुमारे 36,000 नोंदणीकृत स्टार्टअप्स असून, देशातील एकूण स्टार्टअप्सपैकी जवळपास 20 टक्के स्टार्टअप्स या राज्यात आहेत. राज्यातील मजबूत उद्योजकीय वातावरणाचा परिणाम विवा मनीच्या ग्राहकवर्गातही दिसून येतो. महाराष्ट्रातील कंपनीच्या ग्राहकांपैकी 34 टक्के ग्राहक स्वयंरोजगार करणारे आहेत. तुलनेत गुजरातमध्ये हे प्रमाण 46 टक्के, तर राजस्थानमध्ये 44 टक्के आहे.

याबाबत डोन्चेन्को म्हणाले, "स्वयंरोजगार करणारे ग्राहक विवा मनी अॅपचा जबाबदारीने आणि सक्रियपणे वापरत आहेत. आमच्यासाठी हा ग्राहकवर्ग अत्यंत महत्त्वाचा असून भविष्यातही मोठी क्षमता असलेला विभाग आहे."

महाराष्ट्रातील विस्तार हा विवा मनीच्या दृष्टीने सर्वाधिक यशस्वी धोरणात्मक निर्णयांपैकी एक ठरला आहे.

डोन्चेन्को पुढे म्हणाले, "भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या राज्यांपैकी एका राज्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते. महाराष्ट्र आज आमच्या सातत्यपूर्ण वाढीच्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक बनला आहे, याचा आम्हाला आनंद आहे. प्रत्येक राज्याची वैशिष्ट्ये आणि क्षमता वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक बाजारपेठेच्या गरजेनुसार आमची व्यावसायिक धोरणआखणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे."


विवा मनीने देशभरात आतापर्यंत ₹750 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्जवाटप केले आहे. कंपनी सध्या आपल्या नवीन आयटी प्लॅटफॉर्मवर संक्रमणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यामुळे यावर्षी देशभरात पॅन-इंडिया विस्तार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.

आणखी वाचा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget