एक्स्प्लोर

रवींद्र भारती फायनान्शिअल सर्व्हिसेसला सेबीकडून रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स प्राप्त

रवींद्र भारती फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लिया फायनान्स सर्व्हिस क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स प्राप्त केले आहे.

Mumbai (India), February 9: रवींद्र भारती फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लिया फायनान्स सर्व्हिस क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (सेबी) रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स (RA. No - INH000014410) प्राप्त केले आहे. हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याने कंपनी आपल्या मार्केट ॲनालिसिस क्षमता अधिक चांगल्या करण्यास सक्षम झाली आहे. त्यामुळे, सतत बदलणाऱ्या फायनान्स क्षेत्रात पुढे वाटचाल करण्यास क्लायंट्सला दुरदृष्टी उपलब्ध करून देता येणार आहे. या नव्याने प्राप्त झालेल्या लायसन्समुळे, चांगल्या फायनान्स सर्व्हिस देण्याच्या हेतूने कंपनी आपल्या क्लायंट्सना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिसच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ शकेल.

या महत्त्वपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्तते व्यतिरिक्त, या ब्रँडने आपल्या महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत. 2027 मध्ये इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (आय पी ओ) लाँच करण्याच्या प्लँनिंगसह एक महत्वपूर्वक पाऊल टाकण्यास भारती शेअर मार्केट सज्ज होत आहे. फायनान्स क्षेत्रातील कंपनीच्या प्रवासात हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे पाऊल उचलल्याने गुंतवणूकदारांना भारती शेअर मार्केटच्या यशोगाथेचा भाग होता येणार आहे. त्यामुळे कंपनी व कंपनीच्या शेअरधारकांसाठी आर्थिक प्रगतीच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे.  

"सेबी रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स (RA. No - INH000014410) प्राप्त करणे ही आमच्या फायनान्स क्षेत्रातील एक प्रभावी झेप आहे. यामुळे आम्ही आर्थिक क्षेत्रातील सर्व बारकावे तसेच या क्षेत्रातील उत्तम मार्गदर्शन आमच्या ग्राहकांना  देऊ शकू. हे यश आणि भारती शेअर मार्केटच्या आगामी आय पी ओ योजना यांची सांगड घातली गेल्याने आमच्या कंपनीची सगळीकडे चर्चा होत आहेच, त्याचप्रमाणे अनेकजणांना आर्थिक प्रवासाला सुरुवात करण्यास मदत होत आहे ", असे सीएमडी रवींद्र भारती म्हणाले."

याशिवाय, रवींद्र भारती फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि. विविध प्रकारच्या ब्रोकरेज सेवा प्रदान करणार आहेत. यातून या क्षेत्रात कंपनीने केलेल्या लक्षणीय प्रगतीची मोठी झेप दिसून येते. या कंपनीने स्ट्रॅटेजी नुसार त्यांचे मार्केटमधील स्थान आणि सर्व्हिस यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे कंपनीची प्रतिष्ठा वाढली आहे आणि त्यामुळे या अत्यंत स्पर्धात्मक ब्रोकिंग क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी म्हणून या कंपनीचे स्थान भक्कम झाले आहे.

"सेबी रिसर्च ॲनालिस्ट लायसन्स प्राप्त करणे हे फायनान्स क्षेत्रातील महत्त्वाचे पाऊल आमचा दृढनिश्चय आणि ग्राहकांचा आमच्यावर असलेला विश्वास दर्शवते. तसेच कायमचे यश आणि मार्केटमध्ये आघाडीवर राहण्यासाठीचा मार्ग दाखवते.", असे सीएमडी रवींद्र भारती यांनी सांगितले.

अत्यंत बुद्धिमान असलेल्या सीएमडी रवींद्र भारती यांची सुरुवात छोट्या स्वरुपात झाली. पुढे त्यांनी भारती शेअर मार्केटचा पाया घातला. आता पुण्यातील मगरपट्टा भागातील मार्व्हल फ्युगो येथे या  कंपनीचे head ऑफिस आहे. अनेक आव्हाने असूनही ते विचलित झाले नाहीत आणि 2004 मध्ये त्यांनी शेअर मार्केटमधील आपल्या प्रवासाची सुरुवात केली. तेव्हापासून त्यांची कोणत्याही परिस्थितीत न डगमगण्याची व प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची तसेच नेहमीच निर्धाराने पुढे चालण्याची वृत्ती दिसून आली. श्री. रवींद्र भारती यांचा प्रवास अधिकाधिक उंची गाठत गेला आणि आज शेअर मार्केटमध्ये त्यांनी एक प्रभावी स्थान प्राप्त केले आहे. वयाच्या फक्त 35 व्या वर्षी त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याचप्रमाणे ते शेअर मार्केटचे  शिक्षण देणारे प्रशिक्षकही झाले आहेत. शेअर मार्केटच्या माध्यमातून अशा प्रकारचे यश कोणीही संपादन करू शकतो, असे त्यांचे प्रखर मत आहे. भारती शेअर मार्केट आपल्या सर्व महत्त्वाकांक्षी गुंतवणूकदारांना हेच यश मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे.

श्री. भारती हे पुण्यातील भारतीय विद्यापीठातील अभियांत्रिक शाखेचे पदवीधर आहेत आणि आता भारतभर स्टॉक मार्केटविषयी आर्थिक साक्षरता साध्य करण्याच्या उद्दिष्टाने ते प्रेरित आहेत. 1.7 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि 710+ फ्रेंचाइझी पर्यंत भारती शेअर मार्केट पोहोचली असून 10 कोटी भारतीयांना अर्थसाक्षर करण्याचा त्यांचा निर्धार आहे. मराठी, हिंदी आणि गुजराती वृत्त माध्यमांमध्ये रवींद्र भारती नियमितपणे शेअर मार्केटचे ज्ञान देत असतात आणि शेअर मार्केट क्षेत्रातील बारीकसारीक तपशीलांबद्दल लोकांना माहिती देत असतात. रवींद्र भारती यांच्या 18 वर्षाच्या शेअर मार्केटच्या अनुभवावरून त्यांनी शेअर मार्केटची 12 पुस्तके लिहिली आहेत. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हि पुस्तके वाचलीच पाहिजे. 

श्री. रवींद्र भारती यांच्या भारती ग्रुप अंतर्गत फक्त भारती शेअर मार्केट नव्हे तर त्यापलीकडे देखील यांचे विश्व विस्तारले असून त्यात भारती मीडिया, भारती एव्हिएशन, भारती रिसॉर्ट आणि भारती सॉफ्टटेकचा  समावेश आहे. यातून त्यांचा वैविध्यपूर्ण आणि समृद्ध कंपन्यांचा पोर्टफोलियो दिसून येतो.

अधिक माहितीसाठी पुढील वेबसाइटला भेट द्या : https://bhartisharemarket.com/

(Disclaimer: ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.)

अधिक पाहा..

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CRPF Soldier Opens Fire At Camp : CRPF जवानाची कॅम्पमध्ये फायरिंग करत स्वत:वर गोळी झाडली; कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक जागीच ठार, 8 जवान जखमी
CRPF जवानाची कॅम्पमध्ये फायरिंग करत स्वत:वर गोळी झाडली; कॉन्स्टेबल आणि एक उपनिरीक्षक जागीच ठार, 8 जवान जखमी
Share Market : भारतीय शेअर बाजार का कोसळतोय? 'त्या' 970000 कोटी रुपयांचं कनेक्शन समोर...
शेअर बाजार का कोसळतोय? मोठं कारण समोर, FPI नं 970000 कोटी रुपये काढून घेतले अन्...
Harshvardhan Sapkal: भाजपचं सर्वात मोठं हत्यार निष्प्रभ होणार, हर्षवर्धन सपकाळांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करुन काँग्रेस हायकमांडने कसा मास्टरस्ट्रोक मारला?
हर्षवर्धन सपकाळांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करुन काँग्रेस हायकमांडने कसा मास्टरस्ट्रोक मारला?
Video : पीएम मोदी उजव्या हातापासून पाच फूट अंतरावर अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'भारत हा जगात सर्वात जास्त कर आकारणारा देश, मला आरोप करायचा नाही, पण...'
Video : पीएम मोदी उजव्या हातापासून पाच फूट अंतरावर अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'भारत हा जगात सर्वात जास्त कर आकारणारा देश, मला आरोप करायचा नाही, पण...'
Guillain Barre Syndrome In Kolhapur : राज्यात जीबीएसचं थैमान! आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यात पहिला मृत्यू
राज्यात जीबीएसचं थैमान! आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यात पहिला मृत्यू
Dhananjay Deshmukh: बीडची 'बी टीम' कोण चालवतो?  संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुखांचा खळबळजनक आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बी टीम अद्याप बाहेरच; धनंजय देशमुख यांचा खळबळजनक आरोप, म्हणाले..
Patent Office Mumbai to Delhi : आता पेटंट ऑफिस मुंबईतून दिल्लीला हलवण्याचा घाट, आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल करताच पियूष गोयल यांचाही पलटवार; दोघांमध्ये शाब्दिक युद्ध!
आता पेटंट ऑफिस मुंबईतून दिल्लीला हलवण्याचा घाट, आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल करताच पियूष गोयल यांचाही पलटवार; दोघांमध्ये शाब्दिक युद्ध!
Donald Trump on BRICS : BRICS कधीच मेलाय! मोदी अमेरिकेत येण्यापूर्वीच जशास तसा कर लावण्यावर डोनाल्ड ट्रम्प सही करून रिकामे, डाॅलरवरून पुन्हा थेट धमकी दिली
Video : BRICS कधीच मेलाय! मोदी अमेरिकेत येण्यापूर्वीच जशास तसा कर लावण्यावर डोनाल्ड ट्रम्प सही करून रिकामे, डाॅलरवरून पुन्हा थेट धमकी दिली
Embed widget