एक्स्प्लोर

BLOG : संघर्षातून उभा राहिलेला तहसीलदार! संवेदनशील अधिकारी हरपला

BLOG : बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी एका ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील मुलीच्या केसमध्ये व्यक्तिशः संपर्क साधून मदत केली होती. त्यांच्या बोलण्यातून त्यांची मदतीच्या भावनेची, कामाची तळमळ जाणवली होती. अतिशय उमद्या स्वभावाचा प्रामाणिक आणि मेहनती अधिकारी काल अपघाताने आपल्यातून निघून गेला आहे. त्यांचं अकाली जाणं धक्कादायक आणि खूप क्लेशदायक आहे. 

राकेश गिड्डे यांचे वडील अण्णासो गिड्डे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करायचे. घरची जेमतेम कोरडवाहू शेती. या कुटुंबात राकेश जन्माला आला. कष्टाने शिकला, संघर्ष केला आणि तहसीलदार झाला. गावाला त्याचे भारी कौतुक.   

त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले, अनेकांनी यश मिळवले. त्यांचे काम लक्षवेधी होते आणि त्यांचा संसारही आता बहरू लागला होता, पण नियतीला हे मान्य नव्हते. एका अपघातात आज राकेश गिड्डे यांचे काल निधन झाले..

बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे यांच्या अपघाती निधनाची बातमी आज सकाळी येऊन धडकली आणि सारे सुन्न झाले. ते ज्या शाळेत शिकले, त्या शहीद अभयकुमार पाटील विद्यालयासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली. 

2019 ला अधिकारी झालेले राकेश गिड्डे अवघे एकतीस वर्षांचे होते. दीर्घकाळ पुण्यात राहून त्यांनी अभ्यास केला. वडिलांनी कष्टाने त्यांना बळ दिले..ज्या वयात मुले करिअरसाठी संघर्ष करतात, त्या वयात हा पठ्ठ्या तालुक्याचा प्रमुख म्हणून खुर्चीवर विराजमान झाला. 

त्यांच्या हाती जे होते, ते त्यांनी मुक्त हस्ते मदत करत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अडल्या-नडल्या लोकांच्या कल्याणाचे निर्णय गतीने राबवले. बांधावर जाऊन काम करणारा तहसीलदार अशी त्यांची मराठवाड्यात ओळख निर्माण झाली. 

बीडमध्ये काम करणे सोपं नसते, राकेशने ते करून दाखवले. तीन वर्षांपूर्वी थाटामाटात त्यांचे लग्न झाले. दोन वर्षांची मुलगी आहे त्यांना. पोरगा तहसीलदार झाल्याने कुटुंबाचे नशीबही पालटले. शेतीत विकास सुरू झाला. छोट्या-मोठ्या व्यवसायातून प्रगती व्हायला लागली. 

ते दूर मराठवाड्यात असले तरी गावातील अनेक उपक्रमांना त्यांचे पाठबळ असायचे. कोरोना संकट काळात त्यांनी औषधे, वैद्यकीय सुविधांसाठी मदत उभी केली होती.

राज्यातील कित्येक होतकरू तरुणांना ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन करायचे. त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते... ते कष्टाने तहसीलदार झाले, पण त्यांचा डाव अर्ध्यावर मोडला. 

लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ काल पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधन वार्तेने संबंध मराठवाडा सुन्न आहे, त्यांचे मूळ गाव एरंडोलीवर शोककळा पसरली.

भ्रष्टाचाराच्या आणि चाटूगिरीच्या दलदलीत रुतलेल्या प्रशासन व्यवस्थेत राकेश गिड्डेंसारखे अधिकारी मिसफिटच होते, मात्र त्यांच्यासारखे अधिकारी यात उरले नाहीत तर ही व्यवस्था अजूनच बरबटून जाईल! 

हातावर मोजण्याइतके चांगले अधिकारी प्रशासनात कार्यरत असताना राकेश गिड्डेंची अकाली एक्झिट अधिकच क्लेशदायक ठरलीय. 

त्यांच्याशी संवाद झाला तेव्हाच जाणवले होते की हा तरुण अधिकारी खूप संवेदनशील आणि कनवाळू मनाचा आहे. इतक्या चांगल्या माणसासोबत असं घडायला नको होतं. हे काही बरं झालं नाही.. 

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh  माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime:  घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
Embed widget