एक्स्प्लोर

BLOG : हुंड्याशिवाय लग्न - पाठिंबा की विरोध

‘मी हुंडा घ्यायचा नाही असं ठरवलं आहे. त्यामुळे माझं लग्न जमत नाही. मुलगा हुंडा घेणार नाही असं मुलीकडच्यांना कळलं की जुळत आलेली सोयरीक मुलीच्या घरच्यांकडून मोडली जाते. जाम वैताग आलाय राव.'

मध्यंतरी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी एक धडाडीचा पत्रकार मित्र आणि सोबतच माझ्यापेक्षा वयाने थोराड असणारी उच्चशिक्षित मुस्लिम मैत्रीण भेटली. मैत्रीणीसोबतची ही बऱ्याच महिन्यानंतरची भेट होती त्यामुळे एकमेकींची हालहवा विचारणं आपसूकच झालं. राजकारण, समाजकारण, साहित्य, चित्रपट या विषयांवर चर्चा करत करत ऐनकेनप्रकारे आमचा विषय लग्नावर येऊन ठेपला. पुढच्याच वर्षी तिशीत पोहचणाऱ्या माझ्या उच्चशिक्षित मैत्रिणीला तिच्या लग्नाविषयी छेडलं असता ती म्हणाली. ‘गावात गल्लीत सगळ्या छोऱ्या बुरख्यात बसलेल्या असताना अम्माअब्बूची समजूत घालून मी पीजीपर्यंत शिकले. छोटी का होईना पण मला नोकरी आहे. थोबडापण मेरा ठिकठाक आहे.फिर का म्हणून लाखो रूपये दहेज देऊन शादी करू? मेरे घरवालोंकी चमडी बेचकर मै अपना संसार नही सजा सकती रे. एकवेळ शादीच नाही झाली तरी बेहत्तर पण मी दहेज देऊन शादी करणार नाही. असं ठरवलय म्हणून मी अजून सिंगलच आहे.’ असं म्हणून खळखळून हसली. या हसण्याच्या पाठीमागे तिनं किती दुःख लपवलं होतं ते मला तिच्या डोळ्यात दिसलच. तिच्या निर्णयाचा ठामपणा पाहून मला जितकं बरं वाटलं तितकीच तिच्या भविष्याविषयीची काळजी ही दाटून आली. आजवर मी ऐकत होते की मुस्लिम समाजात हुंडा मुलाला नाही तर मुलीला देतात. पण मैत्रिणीच्या बोलण्यावरुन तर प्रकरण वेगळच दिसत होतं. हुंडा पद्धतीनं मुस्लिम समाजातही आपले लंबेचौडे पाय पसरायला सुरूवात केली आहे. वरुन दिसणारं आणि आतलं चित्र संपूर्णपणे वेगळं आहे. माझ्या माहितीनुसार चुकून एखादाच समाज राहिला असेल जिथं हुंडापद्धतीचा शिरकाव झालेला नाही. हे विरोधाभासाचं चित्र माझ्या डोळ्यांसमोर जिवंत आहे तोवर दुसराच अनुभव आला. त्याच दिवशी दुपारी गावाकडचाच पण सध्या पुण्यात राहणारा एक पत्रकार मित्र अचानक भेटला. त्याची चौकशी करताना करताना कळलं की एका ठिकाणी मुलगी बघायला गेला होता. नंतर असंही कळलं की मागच्या बऱ्याच दिवसांपासून पंधरा दिवसांतून, महिन्यातून एकदातरी त्याची गावाकडं कांदेपोहे कार्यक्रमासाठी चक्कर असते. त्याला लग्न न जमण्याचं कारण विचारलं तर म्हणाला. ‘मी हुंडा घ्यायचा नाही असं ठरवलं आहे. त्यामुळे माझं लग्न जमत नाही. मुलगा हुंडा घेणार नाही असं मुलीकडच्यांना कळलं की जुळत आलेली सोयरीक मुलीच्या घरच्यांकडून मोडली जाते. जाम वैताग आलाय राव. एकतर आईबापाला हुंडा न घेता कोर्ट मॅरेज करायचं या गोष्टींसाठी राजी करायला दोन वर्ष गेली. कसेतरी ते राजी झाले तर पुढं वेगळंच ताट मांडलेलं दिसलं. बघेन तोवर बघेन नाहीतर सरळ दोनचार लाख हुंडा घेऊन लग्न करतो बघ मी." बराच तावातावात मित्र बोलत होता. त्याचा वैताग आणि त्याला निर्णयाला मिळणारा नकारात्मक प्रतिसाद त्याचा निर्णय डळमळीत करेल की काय असच मला वाटून गेलं. दोन वेगवेगळी उदाहरणं. एक उच्चशिक्षित मुस्लिम मुलगी रूढी परंपरांविरोधात एल्गार मांडतेय. हुंडा न देता लग्न करायचं म्हणते तर तिला तिच्या समाजात तसा मुलगा तसं कुटुंब मिळत नाही. तिचं खच्चीकरण केलं जातं. तसच दुसरीकडं ज्या जातीत हुंड्याशिवाय लग्नच होऊ शकत नाही तिथं एक मुलगा हुंडा न घेता लग्न करायचं ठरवतो तर त्याच्यातच खोट काढली जाते. त्याच्या विचारांचे गैरअर्थ काढले जातात. ही दोन्ही उदाहरणं केवळ मलाच नाहीत तर समाजातल्या प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी आहेत. आजघडीला प्रत्येक जातीधर्मातली विवाहसंस्था देवाणघेवाणीच्या,भरमसाठ हुंड्याच्या चिखलाने बरबटलेली आहे. प्रत्येकाला इथे लग्नाच्या निमित्ताने साग्रसंगीत हौस करायची इच्छा आहे. त्या इच्छेपायी तो काहीही करायला तयार आहे. कुठूनही पैसा उभा करायची त्याची तयारी आहे.मुलगा असेल तर (तो कुठल्याही नोकरीत वा व्यवसायात असेना) दाबून हुंडा घ्यायचाय.कितीही उच्चशिक्षित मुलं असली आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या जयंतीला त्यांचे वारसदार म्हणून उत्सव साजरे करीत असली तरी ते आईबापाच्या हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीला विरोध दर्शवत नाहीत. उलट नंदीबैलासारखी मान हालवत सासरवाडीकडून जे येईल ते घशात घालतात. एवढ्यावरच थांबत नाहीत तर प्रत्येक सणावाराच्या निमित्ताने ही लुबाडणूक अव्याहतपणे चालूच असते. इकडं मुलीही काही कमी नाहीत.आईबापाला लुटायची हौस त्या स्वतःच्या लग्नात पूर्ण करून घेत असतात. सुई-दोऱ्यापासून ओव्हन लॅपटॉपपर्यंतच्या वस्तू रुखवतात घेऊन जातात. जगाची जगरीत म्हणून आई-बापालाही वाजत गाजत कन्या सासरी धाडायची असते. सगळा राजीखुशीचा मामला असतो.याचा विपरीत परिणाम तळागाळाताल्या अशा लोकांवर होतो. जे लोक शाही लग्नाचा हा रुढ होत चाललेला बेंचमार्क गाठू शकत नाहीत. किंबहुना सद्यस्थितीच्या बेभरवशाच्या काळात जिथं पोट भरण्याची वानवा ज्या वर्गाला पडत चालली आहे त्या वर्गातल्या लोकांची छाती या बाजारु विवाह पद्धतीनं दडपून जाते आहे. आभावग्रस्त वर्गातल्या मुली तर आपल्या आईबापाच्या गळ्याला फास नको म्हणून स्वतःच्याच गळ्याला कायमचा फास लाऊन घेत आहेत. लातूरच्या शितलचं उदाहरण अजूनही ताजं आहे. बहुसंख्य समाज हा पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांच्या धोपट मार्गावरुनच पुढे जाणं पसंत करतो. त्यातच हौसमौज, सुख शोधतो. बहुसंख्यातल्या अल्पसंख्यांना रूढी परंपरांमधली खोच आणि खोट दोन्ही माहिती आहेत तरीही ते बहुसंख्यांत राहण्यासाठी निमूटपणे परंपरांच्या ओझ्याखाली दबून आयुष्य जगत राहतात. पण यातही एक सकारात्मक गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या चळवळीतून असा एक तरूण वर्ग उदयास येतो आहे. ज्याला माणसामाणसांत भेद करणाऱ्या आणि सोबतच माणसाच्या सुखाचं कमी आणि दुःखाचंच अधिक कारण बनत चाललेल्या सनातन परंपरा मान्य नाहीत. कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या आयुष्यातून त्यांना हद्दपार करायच आहे. पण आपला समाज या वर्गाला यत्किंचितही समजून घ्यायला तयार नाही. उलट याच विवेकी विचारांच्या तरूण वर्गाचं खच्चीकरण करण्यात आनंद मानतो. वेळोवेळी त्यांचे पाय ओढण्याचं काम करतो. विवाहसंस्थेला जिथं तंतोतंत सौदेबाजीचं आणि रूक्ष व्यवहाराचं रूप आलं आहे तिथं काही बोटावर मोजाण्याइतकी मुलंमुली गाळात खोलवर अडकलेल्या विवाहसंस्थेला त्यातून बाहेर काढण्यासाठी स्वतःच्या पातळीवर काहीएक ठोस भूमिका घेऊ पाहतात आणि ती कृतीत आणण्याचा जीवतोड प्रयत्न करत आहेत. आपण जग बदलू शकत नाही. निदान स्वतः पुरतेतरी जगाचे नियम नक्कीच बदलू शकतो असा आत्मविश्वास उराशी बाळगून आहेत. त्या अल्पसंख्य तरुणाईच्या वाट्याला काय येतं तर वैताग,अवहेलना आणि नैराश्य. ही प्रचंड वेदनादायी गोष्ट आहे. बाजारु लग्नसमारंभ, हुंड्यासारखी अमानुष प्रथा नाकारुन मानवतावादी विचारांकडं आगेकूच करु इच्छिणारा हा तरुणवर्ग समाजाच्या संकुचित विचारांचा बळी जातो.एकीकडं स्वतःचा स्वतःशी, दुसरा कुटुंबाशी तर तिसरा समाजाशी असा तिन्ही पातळ्यांवर त्यांना संघर्ष करावा लागतो. अशा नाजूक परिस्थितीत सोबत कुणाचीच मिळत नाही. घरची नाराजी आधीच ओढवून घेतलेली असते पुन्हा वरुन समाजाच्या विरोधात जावून समाजाचं टार्गेट होणं भाग पडतं. या सगळ्या बाबींचा विचार करकरुन डोक्याचा भुगा होतो तेव्हा हुंडा न घेता लग्न करण्याचा विचार करणाऱ्या माझ्या मित्राचा निर्णय त्याला असाच वाईट अनुभव येत राहिला तर बदलेल की काय आणि माझ्या उच्चशिक्षित मैत्रीणचा हुंडा न देता लग्न करण्याचा विचार तिला अविवाहित राहायला भाग पाडतो की काय याची भिती वाटू लागली आहे. गढूळ झालेलं समाजचित्र रंगीबेरंगी करण्यासाठी ज्यांचे मानवतावादी हात सरसावले आहेत त्यांचेच हात कलम करणारा समाज निश्चितच अधोगतीकडं वाटचाल करतो आहे हे वेगळं सांगायला नकोच. (लेखिका सोलापूरमधील शिक्षिका आहेत.) kavitananaware3112@gmail.com कविता ननवरे यांचे आधीचे ब्लॉग

खोलेबाईंचे विचार किती खोल खोल खोल

BLOG : माझ्या मराठा बांधवांनो..!

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Crime News : अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
Karan Johar Koffee With Karan : करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंची बदली; 'हे' आहेत नवे कलेक्टर
निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंची बदली; 'हे' आहेत नवे कलेक्टर
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Om Birla Elected as Speaker : आवाजी पद्धतीने मतदानात ओम बिर्लांचा विजयABP Majha Headlines : 05 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPravin Darekar On Amol Mitkari : अमोल मिटकरी यांच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज; दरेकर यांची टीकाRahul Gandhi In Pandharpur Wari : 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यता

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News : अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
अवैध दारू विक्रीसाठी चक्क देवघराचा वापर! जिल्ह्यात दारूबंदी असताना नवनवीन शक्कल
Karan Johar Koffee With Karan : करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या सिझनमधून घेतला ब्रेक; निर्णय घेताना केला सनसनाटी खुलासा!
निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंची बदली; 'हे' आहेत नवे कलेक्टर
निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंची बदली; 'हे' आहेत नवे कलेक्टर
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
IND vs ENG : इंग्लंडचा 'हा' गोलंदाज ठरतोय डोकेदुखी, 2022 सेमीफायनलमध्ये विराट-रोहित-हार्दिकला केलेय बाद 
Nana Patekar On Manisha Koirala : नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
नाना पाटेकरांनी कथित गर्लफ्रेंड मनिषा कोईरालावर पहिल्यांदाच मौन सोडलं; फोन केला का? विचारताच काय म्हणाले?
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी
ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला, आता साहेबांचा नंबर, टीम इंडिया इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यास सज्ज! 
ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला, आता साहेबांचा नंबर, टीम इंडिया इंग्लंडचा हिशेब चुकता करण्यास सज्ज! 
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Embed widget