एक्स्प्लोर

ब्लॉग : जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो...

खास प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास जायला एक चांगला भारतीय पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेला एक चांगला ऑप्शन म्हणजे मुंबईत दोन ठिकाणी सुरु झालेलं खास भारतीय पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं ‘इंडिया बिस्ट्रो’ एक अतिशय चांगला पर्याय आहे.

प्रजासत्ताक दिन म्हणजे आजकाल चाकरमान्यांसाठी एक हक्काचा सुट्टीचा दिवस झालाय, अशा हक्काच्या सुटीच्या दिवशी हमखास पर्यटन स्थळं, रिक्रीएशनची स्थळं एकदम फुल्ल असतात आणि या सगळ्याबरोबर अर्थातच फुल्ल असतात ती जागोजागची रेस्टॉरन्ट्स, छोटी, मोठी, पंचतारांकित सर्व प्रकारच्या रेस्टॉरन्ट्ससाठी असे पब्लिक हॉलिडेचे दिवस म्हणजे फ्रेण्डशिप डे, व्हॅलेंटाईन डे इतके महत्त्वाचे असतात, म्हणून तर खास रिपब्लिक डेचा स्पेशल मेन्यू अनेक ठिकाणी ठेवला जातो.. इतकंच नाही तर तिरंग्यातल्या तीन रंगांचा वापर करुन  काही खास पदार्थ तयार करण्याचीही सगळ्या रेस्टॉरन्टसमध्ये अशा दिवशी प्रचंड चाढओढ असते..मग केक, इतर डेझर्टस यांचे तिरंगी प्रकार खवय्यांचंही लक्ष वेधून घेतात... अशा दिवशी खास भारतीय पदार्थांसाठी एरवी प्रसिद्ध असलेली रेस्टॉरन्ट्स तर देशभक्तीच्या रंगात रंगलेली असतात आणि भारतीय खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडवण्याच्या प्रयत्नात असतात.. अशा अनेक रेस्टॉरन्ट्सपैकी खास प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास जायला एक चांगला भारतीय पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेला एक चांगला ऑप्शन म्हणजे मुंबईत दोन ठिकाणी सुरु झालेलं खास भारतीय पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं ‘इंडिया बिस्ट्रो’ एक अतिशय चांगला पर्याय आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात आता तर या इंडिया बिस्ट्रो नावाच्या भारतीय रेस्टॉरन्टच्या तीन शाखा निघाल्यात आणि त्या सगळ्याच शाखा विविध भागातल्या मुंबईकरांच्या पसंतीला उतरत आहेत.. नावातल्या इंडिया या शब्दावरुन चटकन कळतं की सध्याच्या मल्टीक्युझिनच्या फंदात या रेस्टॉरन्टला पडायचं नाही आणि पूर्णपणे भारतीय पदार्थांचा आनंदच लोकांना द्यायचा हेच त्यांचं उद्दीष्ट...पण हा बिस्ट्रो शब्द मात्र हल्ली बराच ऐकायला मिळतो... अगदी कमला मिल कंपाऊंडमधील आगही मोजो बिस्ट्रोला लागली, त्या नावातही ‘बिस्ट्रो’.. बिस्ट्रो हा शब्द खरं तर फ्रेंच..या बिस्ट्रोसारखाच आजकाल नवीन रेस्टॉरन्टच्या नावात दिसणारा आणखी एक शब्द ‘ब्रेसरी’ हा देखील फ्रेंच शब्द. खरं तर साधासा मेन्यू असलेलं, त्या मेन्यूला साजेसं साधंच डेकोरेशन असलेलं आणि तिथल्या मोजक्याच पदार्थांच्या किमतीही कमी अशा पद्धतीच्या छोटेखानी रेस्टॉरन्टला फ्रान्समध्ये ‘बिस्ट्रो’ म्हणण्याची पद्धत आहे.. एखाद्या शेफने एकट्यानेच जर छोट्या जागेत मोजक्या पदार्थांचं आणि ठराविक वेळेत सुरु राहणारं आऊटलेट काढलं असेल तर त्याला बिस्ट्रो म्हणण्याची तिथली पद्धत..पण त्या संकल्पनेची आणि भारतातल्या किंवा मुंबईतल्या बिस्ट्रो नावाच्या रेस्टॉरन्ट्सची कुठल्याच प्रकारे तुलना होऊ शकत नाही. कारण, मुंबईत तर ज्या ज्या रेस्टॉरन्ट्सच्या नावात बिस्ट्रो आहे, ती कुठल्याच पद्धतीने साधी नाही.. उलट हायएण्ड किंवा महागडी रेस्टॉरन्ट्स या सदरात मोडणारीच सगळी नावात बिस्ट्रो असलेली ही रेस्टॉरन्ट्स आहेत.. अगदी ‘इंडिया बिस्ट्रोही’ त्याला अपवाद नाही. भली मोठी बसण्याची जागा, भव्यदिव्य इंटिरियर आणि भारतीयच पण जराजरासे प्रयोग करुन वैविध्य आणलेला मोजकाच पण हटके मेन्यू असा हा इंडिया बिस्ट्रोचा पसारा आहे. आजकाल रेस्टॉरन्ट्सना त्यांचा मेन्यू तयार करताना पारंपरिक पदार्थांना नवीन ट्वीस्ट देऊन त्या पदार्थाला नवं रुप देण्याबद्दल जसा विचार करावा लागतो, तितकाच विचार करावा लागतो ते शेफच्या कल्पनाशक्तीतून निर्माण झालेल्या नवीन पदार्थाला कशा पद्धतीने सजवून लोकांपुढे पेश करायचं याचा.. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्लेट्स किंवा त्याहीपुढे जाऊन प्लेट्सच्या जागी काहीतरी कल्पक विचार करुन ट्रे किंवा भातुकलीतल्या वस्तूंचाच वापर सर्व्हिंगसाठी करायचा याची तर सध्या जोरदार फॅशन आलीय.. हे करण्यात विविध रेस्टॉरन्ट्समध्ये चढाओढही लागलेली दिसते. पण या स्पर्धेत इंडिया बिस्ट्रो नक्कीच इतर स्पर्धकांच्या स्पर्धेत खूप सरस ठरतं, यात शंका नाही. इथे तर सगळ्यात गंमत आहे ती इथल्या कॉम्पलिमेंटरी पदार्थांची. गेल्या गेल्या टोपलीत पाणीपुरीच्या पुऱ्या आणि इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये दोन प्रकारचं पाणी असा एक ट्रे येतो, बरं हे काही आपण मागवलेलं नसतं तेव्हा चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून वेटरच सांगतो की ‘ये कॉम्पलिमेंटरी है’, नंतर कितीही महाग पदार्थ खाल्ले तरी त्या कॉम्पलिमेंटरी पुरीने आपलं भारतीय मन मात्र सुखावून जातं. ब्लॉग : जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो... तीच तऱ्हा स्टार्टरनंतरच्या एका सरप्राईजची.. स्टार्टर्स संपवून प्लेट उचलून नेल्यात की भातुकलीतील कूकर येतात..त्यात एक कुल्फीसारखा पण जरा वेगळा दिसणारा पदार्थ असतो. चवीला मात्र आपल्या मलई कुल्फीसारखी नसते. जरा तुरट चव जलजिऱ्यासारखी वाटते.. ते म्हणजे पॅलेट क्लिंझर.. ब्लॉग : जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो... आधीची चव पार पुसून टाकून नव्या चवीसाठी जिभेला तयार करता यावं म्हणून ती कुल्फी, ती देखील भातुकलीतल्या छोट्याशा कूकरमध्ये.. बरं हा देखील पदार्थ फुकट म्हणजे कॉम्पलिमेंटरी.. cooker हे दोन कॉम्पलिमेंटरी पदार्थ म्हणजे खऱ्या अर्थाने इंडिया बिस्ट्रोचे हायलाईट्स. पण यांच्याइतकेच इंटरेस्टींग तिथले इतरही पदार्थ असल्याने एरव्ही मल्टीक्युझीन रेस्टॉरन्टमधल्या पदार्थांची चटक लागलेली युवापिढीही ट्विस्टेड इंडियन पदार्थ खाण्यासाठी इंडिया बिस्ट्रो गाठतात.. पालक चाट नावाचा असाच एक फक्त इथे मिळणारा पदार्थ किंवा स्टार्टर. starters खरं तर पालक म्हटलं की कितीतरी लोक नाकं मुरडतात, त्यात पालकाची चाट कशी लागेल हाही अगदी प्रत्येकाला पडणारा प्रश्न.. पण रस्त्यावरच्या हातगाडीच्या छोट्याशा प्रतिकृतीवर थेट पालक भज्यांचे पिरॅमिड आणि चमचमीत चाट पाहून मात्र तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही.. ब्लॉग : जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो... या सगळ्याबरोबर स्टार्टर्ससाठी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसाठी सगळ्यांचा पर्याय असतो तो इथले कबाबचे प्रकार आणि टिक्कासारखे पदार्थ. ग्रील केलेले हे पदार्थ खास छोट्याछोट्या जाळीदार ग्रील्सवर ठेऊन व्हेज खाणाऱ्यांसाठी पनीर सारखे पदार्थ त्या चिमुकल्या ग्रीलवर येतात, तर मांसाहार करणाऱ्यांसाठी चिकन, फिश आणि लॅम्ब यांचे ग्रिल्ड पर्याय आलेला प्रत्येक जण चाखून बघतोच बघतो.. इंडिया बिस्ट्रोमध्ये संपूर्ण भारतीय मेन्यू असल्याने चायनिज वगैरे स्टार्टर्सचा पर्याय नसतोच पण ग्रील्ड स्टार्टर्स मात्र चवीला जबरदस्त असतात पनीर टिक्काचे विविध प्रकार, गिलाफी मुर्ग सारखे चिकनचे प्रकार खाण्यासाठी लोक इंडिया बिस्ट्रोचा पर्याय स्वीकारतात.. अर्थात या पारंपरिक पदार्थांबरोबर पावभाजी फॉन्द्युसारखा काही काळापूर्वीच कुठल्यातरी शेफच्या डोक्यातून आलेला पण आता जागोजागी मिळणारा पदार्थ, दही भल्ले, चाटचे खास त्यांच्या शेफने सजवलेले प्रकार असा हा सगळा स्टार्टर्सचा मेन्यू.. त्यानंतरच्या मेनकोर्सलाही तसं पाहीले तर इतर ठिकाणांच्या तुलनेत पर्याय कमीच, पण जे पर्याय आहेत ते सगळे स्पेशल, काहीतरी स्पेशालिटी आपल्याला प्रत्येक पदार्थात दिसते. ब्लॉग : जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो... चिकनच्या पर्यांयामध्ये तोंडात गेल्याबरोबर विरघळणारं व्हेलवेट चिकन असो किंवा खास ढाबा स्टाईलचं मेथी चिकन असो, इंडिया बिस्ट्रोतले हे पदार्थ खाल्ल्यावर, असं आपण आणखी कुठेतरी खाल्लंय असं नक्की वाटत नाही, कारण इथला प्रत्येक पदार्थ स्पेशल असतो.. भारतीय चवींचा तसंच पारंपरिक पदार्थांचा वापर करुन मॉडर्न भारतीय पदार्थ पेश करण्याचा हा प्रयत्न इंडिया बिस्ट्रोतल्या कॉकटेल्स आणि मॉकटेल्समध्येही दिसतो.. डिकन्सट्रक्टेड टरमरिक मार्टिनी नावाचं एक कॉकटेल तर आता अनेकांचं फेवरेट ड्रिंक झालंय, याला चव आहे ती थेट हळदीची.. पण मार्टीनीमध्ये ती हळद अशी काही मसळली जाते की ती हळदही चवदार लागते..हे इंडिया बिस्ट्रोतलं खास कॉकटेल सादर तर अगदीच अनोख्या पद्धतीने केलं जातं. ब्लॉग : जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो... मार्टिनीच्या ग्लासला चिमच्याने एक छोटासा पिंजरा लटकवलेला असतो आणि त्यात असतात जेलीच्या गोळ्या..ते कॉकटेल चाखण्याइतकंच ते बघणंही आनंददायक असतं.. असा हा सगळा इंडिया बिस्ट्रोचा अनुभव एखाद्या स्पेशल दिवशी घेणं जास्त चांगलं, कारण तसा किमतीचा विचार करता, सगळ्याच पदार्थांच्या किमती इतर ठिकाणांच्या तुलनेत चांगल्याच जास्त आहेत..अर्थात तिथे मिळणारा अनुभवही वेगळा आहे एवढं मात्र नक्की. संबंधित ब्लॉग : जिभेचे चोचले : द अमेरिकन जॉईंट जिभेचे चोचले : आजीच्या पोतडीतील पदार्थांसाठी 'ग्रॅण्डमामाज् कॅफे' जिभेचे चोचले : खवय्यांचं लाडकं लिजेंडरी स्टेटस जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे जिभेचे चोचले - सीएसटीपेक्षाही जुनं पंचम पुरीवाला जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी  – ‘द जे’ जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29 जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget