Blog On Oppenheimer Movie : शाळेत असताना गिरवलेले इतिहासाचे धडे, आणि त्यांचं खरं वास्तव हे न उलगडणारे कोडं आहे मात्र सगळे धागे तपासले तर तर्क लावणं सोप्प असतं असं म्हणतात...


अणुबॉम्ब म्हणलं की धडकीच भरते... त्या दोन शहराचं पुढं काय झालेलं हे आपल्याला माहीत आहे... 


ख्रिस्तोफर नोलनच्या (Christopher Nolan) 'ओपनहायमर' (Oppenheimer) या सिनेमाची का आतुरतेने पाहिली होती हे  सिनेमा मागे दडलेल्या गोष्टीचं कारण आहे.


सिनेमाविषयी थोडक्यात...


'ओपनहायमर'  हा सिनेमा डॉल्बी एटमॉस मध्येच पाहावा... कारण सिनेमा पाहायचा नसून तो ऐकायचा आहे... काहीही होऊद्या हा सिनेमा सिनेमागृहातच पाहायला हवा... या सिनेमाचा आत्मा आहे याचं स्टोरीटेलिंग.


Father of Atomic Bomb 'ओपनहायमर'  यांची गोष्ट आपण पडद्यावर पाहणार आहोतच किंवा तुम्ही  नाव गुगल केलं तर J. Robert Oppenheimer यांच्या प्रकट होण्यापासून ते अगदी वैकुंठाला जाईपर्यंतचं आयुष्याच्या रोलर कोस्टर बद्दल सगळं काही वाचायला पाहायला ऐकायला मिळेल. मात्र ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) यांचा सिनेमा आहे म्हणल्यावर हा सिनेमा सिंगल लेयर मध्ये कसा असेल? 
हा सिनेमा आहे मल्टीलेयर खास नोलान स्टाईलचा म्हणजेच सिनेमाच्या पडद्यावर एकाच वेळी दोन ते तीन टाईमझोनचे वेगवेगळ्या  पात्रांची गोष्ट सुरू आहे. मात्र आपण या सगळ्यांशी जोडले कधी जातो हे लक्षात सुद्धा येत नाही. हे सांगणे कठीण आहे. पण तुम्हाला हे पाहावं लागेल, अनुभवावं लागेल. 


'ओपनहायमर'  हा सिनेमा अॅक्शनचा तडका आणि थरार नाट्य असणारा आहे. कित्येक चाहत्यांना वाटत होतं की, या सिनेमात अनेक धमाके पाहायला मिळतील, मात्र असं काही झालेलं नाही. हा सिनेमा संवादावर आधारलेला आहे. सिनेमा ख्रिस्तोफरने बनवला आहे. म्हणजे यात साधेसुधे संवाद नाही नसून  इतिहास, विज्ञान, राजकीय गोष्टींवर भाष्य करणारे आहेत.


माझं फिजिक्स कच्चं जरी असलं तरी 'ओपनहायमर'ने दिल और दिमाग मध्ये रिऍक्शन सुरू केली आहे. उत्तम सिनेमॅटोग्राफी, कलरग्रेडिंग, तगडं कमेरावर्क ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. त्यातले प्रॅक्टिकल इफेक्टस आणि संगीत (BGM). डायलॉग्स नंतर साउंड डिझायनिंग एवढं जबरदस्त 
आहे की अणुबॉम्बचा धमाका आणि त्यातून येणाऱ्या शॉक वेव्ह असो किंवा सिनेमात टेन्शन वाढवण्यासाठी म्हणा किंवा नायकाच्या मनातली खळबळसुद्धा जबरदस्त आवाजाने वाढवल्याचं लक्षात येतं.. सिनेमा लांबलचक असला तरी तो जाणवत नाही, कारण जबरदस्त डायलॉग्स, साउंड इफेक्टसमुळे तुम्हाला वाटेल तुम्ही त्या पात्रासोबतच बसलेले आहात. मात्र एवढंच पुरेसं नाहीये... 


सिनेमाचं बजेट फक्त एवढ्यावरचं नव्हतं तर सिनेमात काम करायला, हॉलिवूडच्या A ग्रेड कलाकारांची फौज नोलनने उभी केली. एवढे मोठे तगडे कलाकार असताना आपण अभिनयाविषयी तक्रारी अजिबातच करू शकत नाही, सगळ्यांनीच अगदी तोडून टाकलंय... सिलियन मर्फी (Cillian Murphy) रॉबर्ट डाऊनी ज्यूनियर (robert downey jr) ने करियर बेस्ट परफॉर्मन्स दिलाय... तुम्ही आयर्न मॅन वाल्या RDJ ला विसरून जाल... एक अलगच दर्जा कलाकारी केली आहे. 


सिनेमाचा शेवट पाहून बाहेर पडताना, माझ्यासारखे कित्येकजण त्याच विचारात हरवून जातील, 'ओपनहायमर'  हा सिनेमा मानवतेसाठीचा इतिहासातील एक महत्त्वाचा धडा आहे... प्रगती करण्याची मोकळीक पुढं जाऊन मानवतेला धोका निर्माण करेल हे कोणालाही माहीत नव्हतं, मग दररोज एक सूर्य उगवला काय आणि रोज दहा सूर्य उगवले काय? अणुबॉम्ब संशोधन, त्याचा वापर यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करावा की लाखो लोकं मृत्युमुखी पडली त्याचं दुःख पाहावं, अणुबॉम्ब तयार करणारा की त्याचा वापर करणारा, किंवा एकमेकांची एकमेकांशी असलेली स्पर्धा नेमकं मृत्यूस कारण कोण? त्या काळी ऊर्जानिर्मितीच्या निमित्ताने सुरू झालेले शोध पुढं अणुबॉम्बच्या विध्वंस कडे झुकले होते तर मानवी जीवनमान सुधारण्यासाठी आलेलं AI असो.... भविष्यात असलेली अवाहनं कशी भयंकर असतील याचा अंदाज आत्ताच येतोय... 


'ओपनहायमर'  सिनेमा पुन्हा बदल्याची आग् पेटवणार का? भविष्यात अणुबॉम्ब सारख्या किंवा इतर नव्या शोधांच्या युद्धसामग्रीचा वापर करत 'वर्ल्ड वॉर 3' विध्वंसक होणार का? माहीत नाही... मात्र शाळेत असताना अभ्यासलेला इतिहास आणि आत्ता समजणारा इतिहास हा  भाकरी फिरल्या सारखा वेगळा आहे, जेवढा अभ्यास करू तेवढ्या बऱ्याच रंजक लेयर उलगडत जातात... चूक की बरोबर असं काहीही नसतं...  


जे घडतंय ते थांबवणं कोणाच्याही हातात नसतं. तुम्ही असो वा कोणीही; चांगले विचार असो, चुकीच्या गोष्टी, वाईट गोष्टींना कोणीतरी पुढं घेऊन जाईलच...
आपण कोणाच्या मृत्यूचं, विध्वंसाचं कारण व्हायचं की मानवतेसाठी चांगलं प्रामाणिक काम करायचं, शिवाय हे जग त्या प्रामाणिक कामाची खरंच दाद देईल का? शेवटी प्रत्येक व्यक्ती आपापलं कर्तव्य करत असतोच... अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं न मिळणाऱ्या कोड्यात सिनेमा आपल्याला टाकून जातो. 


विनीत सतीश वैद्य
vinit.s.vaidya@gmail.com 


विनीत वैद्य यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग 


पैश्याच सोंग...
दोन दगडांवर पाय...
झेपावे मिलियन्सकडे...
डिजिटल डिस्टन्स


(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही)