सोशल मीडियावर असे बरेच प्लॅटफॉर्म आहेत जिथं प्रत्येकाला सादरीकरण करण्यासाठी एक मंच खुला असतो. कुठंही आपलं नशीब आजमावत बसण्यासाठी रांगा लावून ऑडिशन देणं याला एक भक्कम पर्याय हा सोशल मीडियावरील यू ट्यूबपासून टिकटॉकपर्यंत उभारलेला तिथं मिळणारा अगणित प्रतिसाद युजर्सना करियरच्या संधी देत होता. त्याच्या कलेला जगभर पोहोचवत होता, पण चीनमध्ये Google Search पासून सर्व Applications ना प्रतिबंध आहे आणि पर्यायी प्लॅटफॉर्म चीन सरकारने उभा केला आहे. सर्च इंजिन्स म्हणा किंवा ब्लॉगिंग वेबसाईट, जीमेल, मेसेजिंग सर्व्हिसेस ते न्यूज वेबसाईट शॉपिंगसह फूड डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या इतर सर्व प्लॅटफॉर्म्सना चीनमध्ये पूर्णतः बंदी आहे तर त्यांना स्वतंत्र पर्याय असे आहेत -
Youtube = bilibili
Snapchat = Tik Tok
Instagram = Lofter
Facebook = QQ
What's app = We chat
Twitter = sina weibo
आश्चर्य वाटेल थोडक्यात तुम्ही चीनमध्ये गेलात तर तुमचा मोबाईल चालणार नाही तिथली Applications तुमच्या Android किंवा ios मोबाईलमध्ये डाऊनलोड करावी लागतीलच.
चीनमधील नागरिक याकडे कसं पाहतात किंवा गुगल, फेसबुक तसंच यू ट्यूब न वापरण्याचं बंधन यावर कोणीच का बोलत नाही आणि तिथं आवाज उठवण्यासाठी सुद्धा कोणता प्लॅटफॉर्म नाही. न्यूज मीडियावर देखील चीन सरकारचा अंमल दिसून येईल. आक्षेपार्ह पोस्ट असेल अगदी we chat मधील देखील तरी तो डिलीट होते कोणत्याही प्रकारे सरकारविरोधी गोष्टींना लगाम आहे.
चीनमधील सामान्य नागरिकांना बाहेरील देशात काय सुरु आहे याची कल्पनाही बहुतांश वेळी न मिळालेली पाहायला मिळते. अशा ठिकाणी तुम्ही राहू शकाल का ?
याचसोबत चीनमध्ये कोणताही व्यवसाय सुरु करायचा असेल किंवा असलेली कोणतेही उद्योग, सेवा यातही चीन सरकारचा कंट्रोल असतो. एकंदरीतच तिथे एकच पक्ष आहे आणि त्यांचा पंतप्रधानही बदलला जाणार नाही. त्यामुळे अशी कठोर पाऊल त्यांना राबवतात येत असतील.
या खेरीज भारत-चीन फेस ऑफच्या पार्श्वभूमीवर आणि डेटा सुरक्षा कारणास्तव कालच केंद्राने सांगितल्यानुसार 59 Applications प्रतिबंधित करायचा निर्णय घेतला आणि तो स्वागतार्ह आहेच. पण दुसरीकडे त्या Apps चा खुबीने वापर करणाऱ्या युजर्सना मात्र प्रचंड धक्का बसलेला पाहायला मिळाला आहे. प्रचंड मेहनत करुन फॉलोअर्स कमावलेली आणि यातून पैसा कमवण्याहेतू इथं कित्येक भारतीय मंडळी आपला वेळ सतत देत आली आहे. पण अलिकडे टिकटॉकवर झालेल्या वेड्यावाकड्या गोष्टी आणि आहारी गेलेल्या तरुणाईला यातून बाहेर कसं घेऊन यावं हा ही प्रश्न होता. 15 सेकंदाच्या व्हिडीओसाठी प्राण्यांची हत्या, जातीयवाद, तसेच चुकीच्या गोष्टींना समर्थन देणारे व्हिडीओ समोर आले, गुन्हेही दाखल झाले.
आता यापुढे हीच मंडळी त्यांचा मार्ग कसा बदलतील? सरकारच्या निर्णयास विरोध करतील का? किंवा परत यू ट्यूब ते फेसबुकवर नवा पर्याय शोधतील हे लवकरच पाहायला मिळेल.
नवनवी माध्यमे येतील जातील हा डिजिटल 'सोशल डिस्टन्स' नक्कीच पाळला गेला पाहिजे. डिजिटल साक्षरता झाली पाहिजे. योग्य कॉन्टेन्ट क्रिएटर्सना वाव मिळाला नाही तर परत सिनेसृष्टीतील मंडळीच्या हाती मनोरंजन क्षेत्राची दोर गेलेली दिसेल.