एक्स्प्लोर

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

किती धकाधकीचं असतं न आपलं रोजचं आयुष्य, त्यात मुंबईत राहाणाऱ्यांबद्दल तर बोलायलाच नको. शहराच्या दुसऱ्या टोकाला कुठेतरी रोज नोकरीसाठी जायचं, रोजचा प्रवास ट्रेनने होत असेल तर आठवड्याचे पाच किंवा सहा दिवस हालच हाल, अगदी स्वत:च्या चारचाकी गाडीनेही रोज ऑफिस गाठायचं तरी फार काही सोपं नसतं. ट्राफिकमधून वाट काढत काढत ऑफिस गाठायचं, एकदा ऑफिसमध्ये पोचल्यावर मग तिथली टेन्शन्स, डेडलाईन्स यात आठवडा कसा जातो कळत नाही. तरी बरं अनेक कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये आजकाल पाच दिवसाचा आठवडा असतो, पण त्यातला शनिवार घरची राहिलेली कामं, बॅंका उघड्या असतात त्यामुळे तिथली तुंबलेली कामं, राहिलेली खरेदी असं यात कसा जातो तेच कळत नाही, मग उरतो तो एकच हक्काचा रविवार. शनिवारी रात्री उशीरा झोपल्यानंतर रविवारी उशीरा निवांत उठल्यावर नाश्त्याची वेळ तर टळलेली असते, पण खवय्यांना त्या एका निवांत दिवशी नाश्त्यातले आणि जेवणातलेही चवदार पदार्थ खायचे असतील तर पर्याय एकच – संडे ब्रंच,  ब्रेकफास्ट आणि लंच यांचा एकत्रित पर्याय.. खरं तर अनेक रेस्टॉरन्ट्स असे संडे ब्रंच आयोजित करतात.. विविध पदार्थांची रेलचेल असते अशा संडे ब्रंचेसमध्ये. पण त्यातही पंचतारांकित हॉटेलमधील रेस्टॉरन्टसच्या संडे ब्रंचची सर इतर ठिकाणांना नक्कीच नाही.. नाश्त्याची वेळ निघून गेल्यावर आणि जेवणाची वेळ व्हायच्या बऱ्यापैकी आधी अशी या संडे ब्रंचची वेळ असते आणि ज्या रेस्टॉरन्टमध्ये संडे ब्रंच असतो तिथे विविध पदार्थांचा बुफे लावलेला असतो आणि त्या बुफेतच असते संडे ब्रंचची खरी मजा.. मुंबईला आपण देशाची आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्यामुळेच मुंबईत पंचतारांकित हॉटेल्सची संख्याही खूप मोठी आहे, पंचतारांकित हॉटेल्स म्हणजे खरं तर लक्झरी किंवा ऐशोरामाचं दुसरं नाव आणि तिथल्या संडे ब्रंचेसमध्येही पंचतारांकित टच असतोच.. मुंबईत या संडे ब्रंचसाठी ताज, आयटीसी, ट्रायडन्ट, ओबेरॉय, जे डब्लु मॅरियट असे कितीतरी पर्याय आहेत, पण आपल्या भारतीय चवींना आवडेल असा आणि खूप वैविध्य असलेला संडे ब्रंचचा मेन्यू असतो तो पवईतल्या रिनेसा आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या जे डब्लु मॅरिएटला.. आता तो मेन्यू काय, कसा आणि किती असतो हे सांगतांना मला कायम गजानन महाराजांच्या पोथीतल्या काही ओळी आठवतात, गजानन महाराजांसमोर जेवणाचा कसा थाट होता हे सांगताना – ‘आंबेमोहोर तांदळाचा दोन मुदी भात साजा, नानाविध पक्वानाचा थाट केला तयाने जिलबी राघवदास मोतीचूर, शाकांचे नाना प्रकार, अगणित चटण्या, कोशिंबिरी, वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा’ हे वर्णन वाचतांना कायम तोंडाला पाणी सुटायचं, हे वर्णन केलंय ते स्वातंत्र्यापूर्व काळातलं.. विसावं शतक सुरु होण्याच्या आधीचं, आता काळ बदललाय, जगभरातल्या सगळ्या खाद्यसंस्कृतींची आणि आपली गाठभेट झालीय, अनेक देशातले पदार्थ तर आपलेसे होऊन थेट आपल्या ताटात आलेत.. त्यामुळे पंचतारांकित संडे ब्रंचचा थाट त्या पोथीतल्या प्रमाणेच असतो फक्त पदार्थ मात्र मोठ्या प्रमाणात बदललेत आणि वाढलेत.. जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती नाश्त्याला साधारणपणे खाल्ल्या जाणाऱ्या ब्रेड बटरपासून या संडे ब्रंचचा प्रवास सुरु होतो, तो खरं तर संपतच नाही कारण या बुफेमध्ये मांडलेल्या सगळ्या पदार्थांची नुसती चव घेणंही एका माणसाला खरंच शक्य नसतं, पण एका वेळी इतक्या रुचकर आणि दर्जेदार पदार्थांचे पर्याय  बघणंही एकदम स्पेशल असतं.. त्यात तो अनुभव आणखीच एक्सायटिंग होतो तो खास संडे ब्रंचच्या लाईव्ह काऊंटर्समुळे.. आता हे लाईव्ह काऊंटर्स हा एक भारीच प्रकार असतो. रेस्टॉरन्टमध्ये जिथे आलेल्या लोकांसाठी टेबल्स असतात किंवा जिथे बाकीच्या पदार्थांचा बुफे लावलेला असतो, तिथेच काही टेबल्सवर पदार्थ न ठेवता पदार्थ तयार कऱण्याचं साहित्य आणि छोटा गॅस किंवा शेगडी ठेवलेली असते, त्या टेबलमागे स्वत: शेफ उभा असतो आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने तो शेफ आपल्याला तो पदार्थ आपल्या समोरच तयार करुन देतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा चाटचं लाईव्ह काऊंटर असेल तर भेळ किंवा शेव पुरी शेफ आपल्याला आपल्या आवडीनुसार करुन देणार, तिखट किती हवं, कांदा हवा की नको, शेव किती हवी असं सगळं विचारुन पदार्थ आपल्यासाठी अगदी कस्टममेड.. pasta पास्ता काऊंटर असेल तर व्हेज आणि नॉनव्हेज टॉपिंग्जचे पर्याय छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ठेवलेले दिसतील, मग आपल्याला पास्तामध्ये कुठकुठल्या भाज्या हव्या हे आपण शेफला सांगायचं, ब्रोकोली हवी, मशरुम नको, सॉस कोणता हवा व्हाईट किती रेड ते ही शेफ आपल्याला विचारणार आणि आपल्या आवडीनुसार तयार केलेला गरमागरम पास्ता थेट आपल्या हातातल्या प्लेटमध्ये.. त्यामुळे एखादा पदार्थ खाल्ला पण नाही आवडला म्हणायला वावच नाही कारण तो पदार्थ पूर्णपणे आपल्या चवीनुसार तयार झालेला असतो..आणि पंचतारांकित हॉटेलच्या संडे ब्रंचला एक दोन नाहीतर असे कितीतरी लाईव्ह काऊंटर्स असतात.. चाट काऊंटर, पास्ता काऊंटर, साऊथ इंडियन काऊंटर, मोमो काऊंटर, इतकंच काय तर मध्यंतरी एका संडे ब्रंचला एक मिक्स व्हेज काऊंटरही होता, म्हणजे तिथे मिक्स व्हेजजी ग्रेव्ही शेफ तयार करत होता आणि त्यात भाज्या कुठल्या वापरायच्या हे तो विचारुन टाकत होता.. साऊथ इंडियन काऊंटरवर तर दोसा, उत्तपापासून थेट उप्पम पर्यंतचे सगळे पदार्थ शेफ आपल्यासमोरच गरमागरम तयार करुन देतो आणि मग दोसा असेल तर साधा हवा की मसाला हवा, बटर दोसा हवा का असे पर्याय आपल्याजवळ असतात. उत्तपम, अप्पम असे सगळेच पर्याय आपल्याला साऊथ इंडियन लाईव्ह काऊंटरवर मिळतात, संडे ब्रंच असला की अगदी असायलाच पाहिजे असं लाईव्ह काऊंटर असतं ते एग किंवा अंडा कॉर्नर, उकडलेली अंडी, ऑमलेटचे वेगवेगळे प्रकार, ब्रिटीशांना आवडणारं स्क्रॅम्बल्ड एग असे असे सगळे अंड्याचे प्रकार त्या एकाच काऊंटरवर मिळतात. बरं ब्रंचमध्ये ब्रेकफास्टही येतो त्यामुळे एक खास काऊंटर असतं ते चहा, कॉफी, कॉर्नफ्लेक्स आणि ज्यूसचं. आपल्या आवडत्या सर्व प्रकारच्या चहा, कॉफीचे फ्लेवर्सही तुमची सकाळ ताजीतवानी करतात. पण असं सगळं असतानाही ज्या दोन काऊंटर्ससाठी अशा पंचतारांकित हॉटेलातल्या ब्रंचला जायलाच हवं ती काऊंटर्स म्हणजे डाएट, कॅलरीजबद्दल प्रचंड जागरुक असलेल्यांसाठी खास सॅलड काऊंटर आणि कॅलरी, वजन अशा फालतु गोष्टींकडे बिलकुल लक्ष न देणाऱ्यांसाठी असलेली चिज काऊंटर्स आणि भव्य भव्य अशी डेझर्ट काऊंटर्स.. नॉन व्हेज आणि त्यातही सी फूडच्या चाहत्यासाठी जे डब्लु मॅरिएटसारख्या आलिशान बुफेमध्ये एक वेगळंच काऊंटर असतं.. अख्खे मासे, लॉब्स्टर, श्रिंप सगळं काही ताजं ताजं ठेवलेलं आणि  तुमच्या आवडीचा सी फूडचा पर्यात तुम्हाला हवा त्या पद्धतीने तुमच्यासमोर शेफ शिजवणार, म्हणजे दर्जैदार मासा, तो ही ताजा, दर्जैदार शेफकडून खास तुमच्यासाठी.. salad सॅलड्समध्येही मुख्यत: कोल्ड सॅलड्स किती प्रकारचे असू शकतात याची खरी कल्पना या ब्रंचमुळेच आपल्याला मिळू शकते.. वेगवेगळ्या भाज्यांची सॅलड्स, मोड आलेल्या उसळींची सॅलड्स, मांसाहार करणाऱ्यांसाठी ट्युना फिशचं सॅलड, अंडी असेली सॅलड्स, फळांची सॅलड्स, याचबरोबर काही दह्यातली सॅलड्स असतात, ऑलिव्ह ऑईल वापरुन केलेली सॅलड्स, केवळ फ्रेश क्रिमचा वापर करुन ड्रेसिंग केलेली सॅल़ड्स अशी किमान ५० -६० प्रकारची सॅलड्स तुमच्या ब्रंचचा शुभारंभ कऱण्यासाठी तुमची वाट बघत असतात, या सॅलड्सबरोबर तितकेच आकर्षक वाटतात ते ब्रेड आणि पावांचे प्रकार, साधा ब्रेड, ब्राऊन ब्रेड, गोल गोडसर पाव, थोडासा कडक पाव, फ्रेंच क्रॉसॉ असे ब्रेडचे प्रकार असतात, त्यातले कितीतरी तर आपण कधीच बघितलेले नसतात, जे केवळ अशा बुफेतच बघायला मिळतात.. विदेशी पावांबरोबरच खेटून असतो तो पापडाचा काऊंटर, त्यातही असंच वैविध्य.. साधे पापड, बटाट्याचे पापड, पोह्याचे पापड, केरळी पापड, थोडे तिखट पापड असे कितीतरी प्रकार पापडांचे असतात, खरं तर असं इतकं वैविध्य बघण्यासाठी आणि चाखण्यासाठीच अशा ब्रंचला जायला पाहीजे... या बुफेतला मेन कोर्स म्हणजे मुख्य जेवणाचा तर थाट विचारायलाच नको, खरं तर दोसा, पास्तापासून सगळे पदार्थ साईड डिशेश म्हणून चाखल्यावर पुन्हा भाजी, रोटी, पुलाव असे पदार्थ खायला पोटात जागाच नसते. पण पंचतारांकित हॉटेलचं सगळंच जेवण अगदी प्रथितयश शेफनी तयार केलेलं असतं, त्यामुळे त्याच्या हातची चव कशी काय सोडणार, कारण साध्या भाज्यांमध्येही या शेफनी चव आणण्यासाठी केलेले प्रयोग असतात, मग कधी मेथीची भाजी एक ट्विस्ट घेऊन येते, तर कधी कोफ्त्याचा विचारापलिकडचा पदार्थ तुम्हाला चाखायला मिळतो.. पण या सगळ्यावर कडी करतो तो डेझर्टचा काऊंटर, त्याला केवळ डेझर्टचा काऊंटर म्हणावं की जगभरातले गोड पदार्थ एकत्र असा उल्लेख करावा हा प्रश्न पडावा इतके वेगवेगळे प्रकार ते ही खास फाईव्ह स्टार क्वालिटीचे.. केक, पेस्ट्रीजने सुरुवात होते. desserts-compressed साध्या चॉकलेट केकपासून विविधरंगी, विविध चवींचे अनेक प्रकारचे केक चाखायला इथेच मिळतात, त्या डेझर्ट टेबलवर शेफचं खरं कौशल्य दिसतं असं म्हणायला हरकत नाही.. कारण अगदी कॅरट केक, लेमन टार्टसारखे स्पेशल डेझर्टस म्हणजे शेफच कौशल्यच. आयसिंग केलेल्या केकचे प्रकार जितके तितकेच आयसिंग नसलेले केकचे स्लाईसही. बरं पंचतारांकित हॉटेल आहे म्हणून फक्त केकसारखे गोड पदार्थ मिळतील असंही नाही, गरमागरम जिलेब्या, गुलाबजाम, रसमलाई, रबडी, खिरी, फिरनी यांचीही रेलचेलच असते इथे. बंगाली संदेश, रसगुल्ल्यापासून थेट दक्षिण भारतीय पायसमपर्यंत सगळी गोडाची दुनिया जेवणाच्या शेवटी चाखायची आणि त्यानंतर हवं ते आईस्क्रीम खाऊन आपली ब्रंचची खाद्यसफर संपवायची, अशा निवांत ब्रंचचा आस्वाद घेऊन घरी जायचं आणि पुन्हा मस्त दुपारच्या झोपेसाठी ताणून द्यायचं, याच्याशिवाय आयडियल रविवारची वेगळी कल्पना ती काय असू शकते? ‘जिभेचे चोचले’मधील याआधीचे ब्लॉग :

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget