Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना नोव्हेंबरच्या नवीन आठवड्यात मिळणार मोठ्ठं सरप्राईज; बाप्पाची असणार कृपा? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 3 To 9 November 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 3 To 9 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हा पहिला आठवडा फार खास असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, या आठवड्यात तुळशी विवाहाबरोबरच कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीदेखील साजरी केली जाणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तुमच्या पार्टनरचा तुम्हाला वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातही सपोर्ट मिळेल. थोडाफार इगो तुमचा दुखावू शकतो. तसेच, जे लोक सिंगल आहेत त्यांना चांगला पार्टनर भेटेल.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पर्सनल इगोवर तुमच्या काही गोष्टी येऊ शकतात. तसेच, जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. महिलांना गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. बिझनेसचा विस्तार वाढलेला दिसेल.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवू शकतात. बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला व्हायरल तापाचा सुद्धा सामना करावा जाणवू शकतो. यासाठी सकस आहार घेणं गरजेचं आहे.
मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - पार्टनरच्या बाबतीत जास्त भावनिक होऊ नका. काही निर्णय प्रॉक्टिकल विचार करुन देखील घ्यावे लागतात. तसेच, पार्टनरबरोबर रोमॅंटिक डीनरला जाण्याची संधी सोडू नका. घरात तुमच्या नात्याबद्दल तुम्ही सांगू शकता.
करिअर (Career) - नवीन आठवड्यात कामाच्या संदर्भात काही क्लाएन्ट्सबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. जे लोक हेल्थकेअर, बॅंकिंग आणि आयटी क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांच्यासाठी हा काळ काहीसा आव्हानात्मक असू शकतो.
आर्थिक स्थिती (Wealth) - तुमच्याकडे पैसा येईल पण त्याचा तुम्हाला जपून वापर करता आला पाहिजे. पैशांचा गैरवापर करु नका. तसेच, विनाकारण पैसे खर्च करु नका. शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष द्यावे लागेल. या काळात वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच, ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















