Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा सतर्कतेचा; कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 3 To 9 November 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 3 To 9 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हा पहिला आठवडा फार खास असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, या आठवड्यात तुळशी विवाहाबरोबरच कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीदेखील साजरी केली जाणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असेल. या आठवड्यात तुमच्या लव्ह लाईफमध्ये अनेक गोष्टी घडताना दिसतील. तसेच, जे सिंगल लोक आहेत त्यांना लवकरच पार्टनर भेटू शकतो.
करिअर (Career) - धनु राशीच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, या आठवड्यात नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. तसेच, क्रिएटिव्ह गोष्टींकडे तुमचा कल जास्त असेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - जर तुम्ही तुमच्या खर्चावर आणि बचतीवर लक्ष दिलं तर तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तसेच, विनाकारण पैसा खर्च करु नका. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला फटका बसू शकतो.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. मात्र, तुमची लाईफस्टाईल बदलण्याची गरज आहे. तरच इतरांवर त्याचा प्रभाव दिसेल आणि तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल.
मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - मकर राशीच्या लोकांनी आपल्या पार्टनरबरोबर ओपन कम्युनिकेशन ठेवण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या मूल्यांचा देखील आदर राखा. तुमच्या पार्टनरच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह राहण्याची गरज आहे.
करिअर (Career) - तुम्ही तुमच्या कामात फार व्यस्त असाल. मात्र, तुमच्या ध्येयावरुन लक्ष भरकटता कामा नये. तसेच, सहकाऱ्यांचं मत देखील विचारात घ्या. तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती सुरळीत चालेल. तसेच, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. विनाकारण पैसे खर्च करु नका. नवीन योजनांचा लाभ घ्या.
आरोग्य (Health) - मकर राशीच्या लोकांनी नियमित दिनश्चर्येचं पालन करणं गरजेचं आहे. या काळात बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















