(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Horoscope 29 May To 4 June 2023 : हा आठवडा 'या' राशींसाठी लाभदायक, तर इतर राशींसाठी आव्हानात्मक; साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 29 May To 4 June 2023 : या आठवड्यात ग्रहांच्या हालचालीत बदल आहेत. यासाठी सर्व 12 राशींचे राशीभविष्य जाणून घेऊयात.
Weekly Horoscope 29 May To 4 June 2023 : मे महिन्यातील शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. हा आठवडा मेष, मिथुन आणि तूळ राशीसाठी खास असणार आहे. तर, मकर आणि मीन राशीसाठी हा आठवडा थोडा चिंतेचा आहे. एकूणच 12 राशींचा हा आठवडा कसा असणार आहे? यासाठी सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊयात.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला प्रेम जीवनाचा आनंद घेता येईल. जर तुमच्या प्रियकराची काही समस्या असेल तर तुम्ही ती सोडवण्यासाठी त्यांना मदत कराल. आठवड्याच्या मध्यात काही आव्हाने समोर येतील. विरोधक तुम्हाला सतत खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. तुमची तब्येतही काहीशी कमकुवत राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात घरगुती जीवनात काही तणाव असू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसाय मध्यम राहील. नोकरी करणाऱ्यांना चांगले यश मिळेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक जीवनात काही तणाव जाणवू शकतो. वडिलांसोबतही वाद होऊ शकतो. नोकरीत मेहनत घ्याल. आठवड्याच्या मध्यात आवक वाढेल. तुमचे काम पूर्ण होईल. पैशाअभावी कोणतेही काम थांबणार नाही. नोकरीत बदल होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात खर्चाला वेग येईल. विरोधकांचे वर्चस्व राहील आणि तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामात संघर्ष करावा लागेल, तरच यश मिळेल.
मिथुन
मिथुन राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला मित्रांबरोबर चांगला वेळ घालवतील. काही प्रवासाचे नियोजन देखील केले जाईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची साथ मिळेल. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. नोकरीत परिस्थिती चांगली राहील. व्यवसायातही यश मिळेल. आठवड्याचे शेवटचे दिवस त्रासदायक असू शकतात. उत्पन्न वाढेल पण काही आव्हाने समोर येतील. खर्चात वाढ होईल. प्रियकराशी वाद होऊ शकतो.
कर्क
कर्क राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला काही छोट्या प्रवासाला जाण्याचा योग येईल. काही महत्त्वाच्या कामात मित्र तुम्हाला मदत करतील, त्यामुळे तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. आठवड्याच्या मध्यात कौटुंबिक जीवन तणावपूर्ण असू शकते. पालकांच्या आरोग्याची तुम्हाला सतत चिंता जाणवेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात खर्चावर नियंत्रण राहील. उत्पन्नात वाढ होईल. प्रेम जीवनात चांगला काळ येईल. व्यवसायात लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रतेने चांगले परिणाम मिळतील.
सिंह
आठवड्याची सुरुवात खूप शुभ असणार आहे. जे लोक खूप दिवसांपासून काही मोठ्या प्रकल्पात सहभागी होण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीने दीर्घकाळ रखडलेले काम पूर्ण होईल, त्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवू शकतात. व्यवसायाला पुढे नेण्याचे नियोजन प्रत्यक्षात साकार होताना दिसतील. जर तुम्हाला काही काळ आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर त्यात लक्षणीय सुधारणा होईल.
कन्या
आठवड्याची सुरुवात जीवनाशी संबंधित सर्व अडथळे दूर करण्यात जाईल. न्यायालयाशी संबंधित प्रकरणांमध्ये, निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही खूप दिवसांपासून नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. कामासोबतच आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. जेवणाची विशेष काळजी घ्या. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्यासमोर तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर आठवड्याच्या मध्यात तुमच्या भावना व्यक्त करा.
तूळ
आठवड्याचा शेवट संमिश्र असेल. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. या दरम्यान हंगामी आजारांपासून सावध रहा. यासोबतच या काळात खाण्यापिण्याची खूप काळजी घ्या. तुमच्या समस्यांकडे पाठ फिरवण्याऐवजी तुम्ही त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. प्रेम संबंध चांगले ठेवण्यासाठी घाई टाळा आणि विचारपूर्वक पुढे जा. तुमचा जोडीदार कठीण काळात तुमच्या पाठीशी असेल.
वृश्चिक
आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या विरोधकांशी खूप सावधगिरी बाळगावी लागेल. अशा लोकांशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जे वारंवार तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. घाई करण्याऐवजी कोणतेही काम हुशारीने करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. हंगामी किंवा कोणत्याही दिर्घकालीन आजाराच्या उद्रेकामुळे शरीर आणि मन दुखू शकते. या दरम्यान तुमची जीवनशैली योग्य ठेवा आणि खाण्याकडे विशेष लक्ष द्या. कोणत्याही परिस्थितीत आपल्या वरिष्ठ आणि कनिष्ठांशी संबंध बिघडू देऊ नका.
धनु
आठवड्याच्या सुरुवातीला जीवनाशी निगडीत अडचणी सुकर होताना दिसतील. मित्राच्या मदतीने दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. मुलांशी संबंधित कोणतीही चांगली बातमी मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात लांब अंतराचा प्रवास करावा लागेल. नातेसंबंध विस्ताराच्या दृष्टीने प्रवास सुखकर आणि शुभ राहील. या काळात तुम्हाला घराच्या सजावटीसाठी किंवा दुरुस्तीसाठी तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील, ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.
मकर
मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला चांगल्या उत्पन्नाचा फायदा होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. वैवाहिक जीवनात सुख राहील. आठवड्याच्या मध्यात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे. त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे.
कुंभ
कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करतील. नोकरीत खूप मेहनत घेत असल्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल पण नंतर तुम्हाला याचाच फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. व्यवसायासाठीही हा आठवडा चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यात प्रेम जीवनासाठी वेळ चांगला असेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत काही खर्चात वाढ होईल. तब्येत बिघडू शकते. विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात, सावध राहा.
मीन
मीन राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची अनेक कामे पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कामात यश मिळेल. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळेल. चुका टाळा आणि तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत उत्पन्न चांगले राहील. प्रेम जीवनासाठी वेळ चांगला आहे. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :