Weekly Horoscope 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 24 October To 03 November 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 24 October To 03 November 2024 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा फार खास असणार आहे. कारण या आठवड्यात दिवाळी असल्या कारणाने अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आणि नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात नशिबाची चांगली साथ मिळेल. अनेक दिवसांपासून जर तुम्ही दीर्घ आजाराने त्रस्त असाल तर तुमची ही समस्या दूर होईल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, प्रेमाच्या बाबतीत जास्त भावनिक राहू नका. अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य आहे. प्रेम संबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्ही नात्यात संवाद वाढवण्याची जास्त गरज आहे. महिलांना या काळात कामात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात करिअरच्या बाबतीत तुमच्या आरोग्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तसेच, तुम्ही मानसिक तणावात असाल. तणावापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही नियमित योगासन, ध्यान करु शकता. तसेच, आहाराची विशेष काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या शब्दांवर जास्त भर देणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात कोणालाही अपशब्द बोलू नका. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. फक्त एकमेकांना वेळ द्या. तुमच्या पार्टनरला फिरायला घेऊन जा. घाई गडबडीत कोणत्याही गुंतवणुकीचा विचार करु नका.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुम्हाला काहीसा त्रास जाणवेल. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करा. तसेच, तुमचं बॅंक बॅलेन्स पाहून तुम्हाला फार चांगलं वाटेल त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. तसेच, व्यवहाराच्या बाबतीत सावध राहा.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमच्या घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तसेच, आरोग्याच्या बाबतीत थोडेसे सतर्क राहा. सकाळी उठून ध्यान, योगा करणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :