Weekly Horoscope 20 To 26 January 2025 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 20 To 26 January 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया.
Weekly Horoscope 20 To 26 January 2025 : आजपासून नवीन आठवडा सुरु झाला आहे. जानेवारीचा नवीन आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. या आठड्यात काही राशींना लाभ मिळणार आहे. तर, काही राशींना तोटा होणार आहे. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊया.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येईल. या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील, किंवा इच्छित यश मिळू लागेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. व्यवसाय करत असाल तर व्यवसायात प्रगती होताना दिसेल. या आठवड्यात काही कामासाठी तुमचा सन्मान होईल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
नवीन आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांमध्ये आश्चर्यकारक ऊर्जा आणि उत्साह दिसेल. कुटुंबाच्या हितासाठी घेतलेले निर्णय तुम्हाला यश मिळवून देतील. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आपली दैनंदिन दिनचर्या आणि आहाराची काळजी घ्या.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल, कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. काही महत्त्वाच्या कामात चढ-उतार जाणवतील. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कामाबद्दल नकारात्मक विचार करू नका. प्रेमसंबंधात अहंकार दाखवणं टाळा.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
नवीन आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी लाभाचा ठरेल. या आठवड्यात करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला इच्छित लाभ होईल. या आठवड्यात तुम्ही वाहन खरेदी करू शकता. मुलांशी संबंधित कोणतीही समस्या सोडवता येईल. जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवू शकाल. तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आयुष्यात कोणी व्यक्ती प्रवेश करू शकते.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची आणि नातेसंबंधांची चांगली काळजी घ्यावी. या आठवड्यात तुमचे एखाद्याशी वाद होऊ शकतात. आपला आहार आणि दैनंदिन दिनचर्या योग्य ठेवा. तुमचं लव्ह लाईफॉ सुधारण्यासाठी जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. व्यवसायात तुम्हाला चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणतेही काम अर्धवट सोडू नये. कोणतेही नियम आणि कायदे मोडणं टाळा. पैशाचा योग्य वापर करा. अनावश्यक खर्च करू नका. आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ रहा. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा, नाहीतर संबंध बिघडू शकतात. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ आणि लाभदायी ठरेल. या काळाच तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. तुमचा मान-सन्मान वाढेल. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारासोबत प्रेम वाढवण्याची संधी मिळू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीने तुमचं एखादं काम पूर्ण होईल. तुम्हाला व्यवसायात मोठी रक्कम मिळू शकते. महिलांना या आठवड्यात धार्मिक कार्यात वेळ घालवता येईल. लव्ह लाईफमध्ये शांती राहील.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्ही काही कामासाठी प्रवास करू शकता. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवू शकाल. या आठवड्यात तुमची धार्मिक कार्यात रुची वाढू शकते. तुमच्या प्रियकराकडून तुम्हाला एखादं सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात सर्व वादांपासून दूर राहावं लागेल. या आठवड्यात तुमच्यावर कामाचा जास्त ताण येऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कामात जास्त वेळ द्यावा लागेल. वीकेंडला सावध राहा, तुमच्या जोडीदारासोबत तुमचे काही विषयांवरुन वाद होऊ शकतात. प्रेमसंबंधात विचारपूर्वक पाऊल टाका.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात आपली कामं पूर्ण करण्यासाठी घाई करावी लागेल. व्यावसायिक भागीदारांसोबत सुरू असलेले मतभेद दूर होतील. या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. व्यवसायाच्या विस्ताराची योजना असेल तर त्यात यश मिळेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीचे लोक या आठवड्यात एखाद्या कामासाठी प्रवास करू शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याचीही संधी मिळेल. उत्पन्नाचे वेगळे स्रोत निर्माण होतील. नोकरीत पदोन्नतीचा फायदा होऊ शकतो. मुलांशी संबंधित कोणतीही जबाबदारी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. या काळात आरोग्य उत्तम राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :