Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. डिसेंबरचा तिसरा आठवडा लवकरच सुरू होत आहे, त्यामुळे अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास (Aries Weekly Horoscope)


या आठवड्यात तुमच्यात एक नवी ऊर्जा दिसून येईल. कामात नवीन सुरुवात होण्याची चिन्हं आहेत, तुम्हाला वरिष्ठांकडून एखादी वेगळी जबाबदारी दिली जाऊ शकते. वैयक्तिक जीवनातही आनंदाचं वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ यशाचा असेल. जुनी गुंतवणूक लाभ देऊ शकते. नवीन आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्या.


वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)


डिसेंबरचा तिसरा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी सावधानतेचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नातेसंबंध नीट हाताळण्याची गरज आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने संबंध दृढ होतील. आर्थिक बाबतीत शहाणपणाने निर्णय घ्या. करिअरमध्ये सावध राहा, कारण सहकारी तुमच्या योजनांमध्ये अडथळे निर्माण करू शकतात.


मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे. नवीन आठवड्यात प्रवासाचे योग आहेत, जे फायदेशीर ठरतील. तुमच्या कामाच्या संदर्भात वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबतच्या नात्यात पारदर्शकता ठेवा.


कर्क रास (Cancer Weekly Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. संयमाने आणि समजून घेऊन काम करा. नोकरदारांसाठी वेळ सकारात्मक राहील. कौटुंबिक वाद टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या.


सिंह रास (Leo Weekly Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रगतीचा असणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन योजना राबवण्यासाठी आहे. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हं आहेत. मित्र आणि कुटुंबियांसोबत चांगले क्षण घालवाल. आर्थिक स्थिती मजबूत असेल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा.


कन्या रास (Virgo Weekly Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असेल. कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा यश आणि समाधान देईल. करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासासाठी अनुकूल राहील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक