Winter Travel: सध्या डिसेंबरचा महिना सुरूय. अशात गुलाबी थंडीचा अनुभव सगळे घेत आहेत. डिसेंबर महिन्यात ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीसाठी लोक फिरायला जायचा प्लॅन करतात. अनेक लोक विविध हिल स्टेशन्सला जातात. मात्र जिथे जास्त गर्दी असते. त्याठिकाणी नीट एन्जॉट करता येत नाही. काही लोकांना या दिवसात बर्फाचा आनंद घ्यायचा असतो, यासाठी अनेक लोक हिमाचलला जाण्याची प्लॅन करतात. या ठिकाणी बर्फवृष्टी होताच सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होतात. अशावेळी बर्फाचे सुंदर दृश्य पाहिल्यानंतर लोकही तिथे गर्दी करू लागतात. पण ही गर्दी तुमची सहल बिघडवते. कारण, तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिमाचल प्रदेशातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे पर्यटकांची गर्दी अगदी कमी असते, जिथे गेल्यानंतर तुम्हाला बर्फवृष्टीचा आनंद घेता येईल.. जाणून घ्या..
काही खास ठिकाणं, जिथे असते कमी गर्दी
हिवाळ्यात, ख्रिसमस आणि नवीन वर्षात या बर्फाच्या ठिकाणी सर्वाधिक गर्दी असते. जरी ही ठिकाणे रोमँटिक वातावरण आणि छायाचित्रांसाठी योग्य मानली जातात, परंतु जर तुम्हाला सर्वत्र गर्दी दिसत असेल तर तुम्ही चांगले फोटो कसे काढाल. अशा लोकांसाठी आम्ही काही खास ठिकाणांची यादी घेऊन आलो आहोत. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला कमी गर्दी दिसेल.
लाचुंग - हिमवर्षावासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक
बऱ्याचदा लोकांना बर्फाचे दृश्य पाहण्यासाठी शिमला, मनाली आणि काश्मीर सारख्या ठिकाणी जायला आवडते. पण लाचुंगला जाण्याचा बेत आखला पाहिजे. सिक्कीममधील लाचुंग हे देखील हिमवर्षावासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते. हिवाळ्याच्या काळात हिमालय पर्वत पूर्णपणे बर्फाने झाकलेला असतो. सिक्कीममधील नाथुला पासमध्ये तुम्हाला बर्फ दिसेल आणि इथे गर्दी कमी असेल. कारण अधिकाधिक लोक हिमवर्षाव पाहण्यासाठी शिमला-मनालीसारख्या ठिकाणी जातात.
जुब्बारहट्टी - जास्त गर्दी नसल्याने फोटोही चांगले येतील
जर तुम्हाला शिमल्याजवळील अशा ठिकाणी जायचे असेल जिथे पर्यटक नसतील तर तुम्ही जुब्बारहट्टीला जाण्याचा प्लॅन करू शकता. शिमल्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे. बर्फवृष्टीमुळे, लोक फक्त शिमल्यातील दृश्य पाहण्यास प्राधान्य देतात, त्यामुळे तुम्हाला जुब्बारहट्टीमध्ये जास्त गर्दी दिसणार नाही. येथे तुम्ही तुमच्या कुटुंब आणि जोडीदारासोबत बर्फात तासनतास खेळू शकता. तसेच, जास्त लोक येत नसल्यामुळे, फोटोही चांगली येतील.
गुलाबा - ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता
मनालीच्या आसपास कमी गर्दीचे ठिकाण शोधत असाल तर गुलाबाला जाऊ शकता. हिमाचल प्रदेशातील मनालीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी तुम्हाला पर्यटक कमी दिसतील. त्यामुळे तुम्ही बर्फात आरामात खेळू शकता. या हिल स्टेशनला काश्मीरचे राजा गुलाब सिंग यांचे नाव देण्यात आले आहे. लोक या ठिकाणाला बर्फाचे मैदान या नावानेही संबोधतात. येथे तुम्ही ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता.
हेही वाचा>>>
Maharashtra Hidden Places: थंड हवा.. निसर्गरम्य..कमी गर्दी, महाराष्ट्रातील 'असे' ठिकाण, हिवाळ्यात पर्यटकांची पहिली पसंती बनतंय! फार कमी लोकांना माहित
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )