Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी सप्टेंबरचा तिसरा आठवडा कसा असणार? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 15 To 21 September 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 15 To 21 September 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा संपून लवकरच तिसरा आठवडा सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण सध्या पितृपक्ष (Pitru Paksha 2025) पंधरवडा सुरु होणार आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा (Surya Grahan 2025) योग जुळून आला आहे. त्यामुळे सप्टेंबरचा तिसरा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. नवीन भेटीगाठी होतील. तसेच, काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल. आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभ होईल. मात्र, आठवड्याच्या शेवटी आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार अनपेक्षितपणे वाढलेला दिसेल. समाजातील प्रतिष्ठीत लोकांबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रमोशनचे संकेत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करत राहा. नवीन गोष्टींचा स्वीकार करा. तसेच, सामाजिक संबंध जपण्याचा प्रयत्न करा.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांची नवीन आठवड्यात तब्येत एकदम ठणठणीत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. मानसिक शांतीसाठी तुम्ही नियमित ध्यान आणि योगा करणं गरजेचं आहे. तसेच, पितृपक्ष सुरु असल्या कारणाने गरजूंना अन्नदान करा. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फार सकारात्मक वाटेल. मित्रांची साथ सोडू नका.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी बॉसकडून देखील तुमचं कौतुक केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला फार प्रसन्न वाटेल. अशीच प्रामाणिकपणाची साथ सोडू नका. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या काळात अनेक घडामोडी तुमच्याबरोबर घडतील. त्या गोष्टींमधून शिकण्याचा प्रयत्न करा. तसेच, धार्मिक कार्यात सहभागी व्हा. तुमचं मन प्रसन्न आणि सकारात्मक राहील. काही गोष्टींमुळे तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो. मात्र, त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कामातून वेळ काढून तुम्ही लांबच्या प्रवासाला जाल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. या आठवड्यात अनेक नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. माणसं जोडण्याचा प्रयत्न करा आणि आध्यात्माची साथ सोडू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















