एक्स्प्लोर

Weekly Horoscope 15 July To 21 July 2024 : नवीन आठवडा सर्व 12 राशींसाठी कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 15 July To 21 July 2024 : साप्ताहिक राशीभविष्याच्या दृष्टीने काही राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 15 July To 21 July 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल.  जुलै महिन्याचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या अनेक नवीन संधी मिळतील आणि तुमच्या सर्व योजना यशस्वीही होतील. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. जर तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असेल तर तोही संपुष्टात येईल. या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत तुमची व्यावसायिक प्रगती होईल.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

तुमची प्रलंबित कामं या आठवड्यात पूर्ण होतील. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ते या आठवड्यात पूर्ण होणार नाही. काही नकारात्मक बातम्या कानावर पडतील. नोकरदार लोक काही काम बेफिकीरपणे करतील. या आठवड्यात तुम्हाला काही आरोग्य समस्या भेडसावू शकतात, परंतु काळजी करण्यासारखं काही नाही. वैवाहिक जीवन सुखकर राहील. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील आणि परीक्षेत यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळत राहील.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी हा आठवडा खूप चांगला राहील आणि तुम्हाला पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील आणि सर्व कामं वेळेवर पार पडतील. विरोधक तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु ते अयशस्वी ठरतील. नोकरदारांची कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. या आठवड्यात आरोग्यही चांगलं राहील. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

नवीन आठवड्यात कर्क राशीचे लोक शनीच्या प्रभावाखाली असतील, त्यामुळे कोणाचंही नुकसान करण्याचा विचार करू नका. प्रत्येक कामात भरपूर मेहनत केल्यावरच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर महत्त्वाची कागदपत्रं सुरक्षित ठेवा. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींवर केंद्रित होऊ शकतं. तुमच्या जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता आहे. या दिवसांत तुमची तब्येत चांगली राहील.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

या आठवड्यात तुम्ही कामाच्या दबावातून मुक्त व्हाल. तुम्हाला विश्रांतीची संधीही मिळेल. जर तुम्ही नोकरी व्यवसायात असाल तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील. व्यावसायिकांच्या कामात गती येईल. आरोग्याकडे लक्ष द्या, या आठवड्यात दुखापत होण्याची भीती आहे. या आठवड्यात विद्यार्थ्यांचा वेळ फालतू कामांमध्ये वाया जाईल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. या काळात अधिक पैसे खर्च करावे लागतील.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

तुम्ही खूप दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर या आठवड्यात सर्व अडथळे दूर होतील. व्यावसायिक त्यांच्या कामात खूप व्यस्त राहतील. या आठवड्यात तुम्ही ज्या काही योजना आखत आहात ते यशस्वी होतील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचीही संधी मिळेल. वैवाहिक संबंध चांगले राहतील. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे.तुम्ही करत असलेल्या कामांना चांगली गती येईल. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, अचानक धनलाभाचे योग आहेत. आठवड्याच्या मध्यात तुमच्या व्यापारात चांगली वाढ होईल. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी असेल. मन प्रसन्न असेल. समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फलदायी असणार आहे. या काळात तुम्ही व्यवसायात घेतलेल्या तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. दिवसेंदिवस तुमची प्रगती होईल. जर तुम्हाला या काळात वाहन किंवा नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. पैशांची गुंतवणूक देखील या काळात तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकते. 

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आनंदाचा, उत्हासाचा तितकाच संघर्षमय असणार आहे. या काळात तुम्हाला काही संकटं देखील येतील. याचा तुम्ही धीटाने सामना करणं गरजेचं आहे. यासाठी मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार मोलाचा ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. जर तुमचे अनेक दिवसांपासून एखादं काम रखडलं असेल तर ते तुम्ही या काळात पूर्ण करू शकता. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर तुमचा बॉस प्रभावित होईल. अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील. या कालावधीत तुमचं आरोग्य देखील चांगलं असणार आहे. नियमित व्यायाम करा. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा असणार आहे. आयुष्यात तुम्ही खूप यश प्राप्त कराल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. तुम्ही जे काही कार्य कराल त्यात तुमचं मन रमेल. प्रत्येकजण तुमच्या कामाचं कौतुक करेल. तुमचं वैवाहिक जीवन अगदी आनंदात जाईल. जोडीदाराचा प्रत्येक कार्यात तुम्हाला पाठिंबा मिळेल. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अनेक आव्हानांचा असणार आहे. या काळात तुम्ही करत असलेल्या कामापेक्षा जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. तरच, तुमची प्रगती निश्चित आहे. या काळात तुमचं आरोग्य चांगलं असेल पण कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 15 July To 21 July 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
Maharashtra weather Update: झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरातTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 15 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7AM : 15 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM :  15 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
Maharashtra weather Update: झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
One Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
'एक देश एक निवडणूक' घटनादुरुस्तीत काय म्हटलंय? विधानसभांचा कार्यकाल किती असणार? 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्रिपदाचं पहिलं नाव समोर, सुनील तटकरेंचा नरहरी झिरवाळ यांना फोन
दादांच्या राष्ट्रवादीतील पहिलं नाव समोर, नरहरी झिरवाळ यांना सुनील तटकरेंचा शपथविधीसाठी फोन
Embed widget