(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी फायद्याचा की तोट्याचा? जाणून घ्या मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते मीन या सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊयात.
Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : मे महिन्याचा तिसरा आठवडा उद्यापासून सुरु होणार आहे. हा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे. तर, काही राशींसाठी आव्हानात्मक असणार आहे. एकूणच मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते मीन या सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं असेल. तसेच, तुमच्या कुटुंबियांच्याही आरोग्यात चांगली सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो, पण ते पैसे तुमच्यापर्यंत येण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागेल. तुमची मुलं तुम्हाला त्रास देऊ शकतात. पण, मुलांच्या सुट्ट्या सुरु असल्या कारणाने तुमच्याकडे काही पर्याय नसेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. कारण या आठवड्यात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. या आठवड्यात कोर्टासंबंधित कामे करू नका. तसेच, तुमच्या कामाच्या ठिकाणी वातावरण सामान्य असेल. तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. पण, तब्येतीची योग्य काळजी घ्या. अन्यथा तुमची तब्येत बिघडू शकते.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
जर तुम्ही अधिकारी किंवा कर्मचारी असाल तर तुमच्या पदात लवकरच वाढ होऊ शकते. कोर्टासंबंधित कामकाजावर कोणत्याच प्रकारची रिस्क घेऊ नका. ज्या ब्लड प्रेशर आणि डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी वेळेवर औषधं गोळ्या घ्यावीत अन्यथा तुमचा त्रास वाढू शकतो. या आठवड्यात नशिबाची थोडीफार साथ तुम्हाला मिळेल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने येणारा आठवडा लाभदायक ठरणार आहे. तसेच, तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. तसेच, तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर त्यातही जोडीदाराचा महत्त्वाचा वाटा असेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी येणारा आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात जोडीदाराची तुम्हाला साथ मिळेल. तुम्ही मागचे काही दिवस ज्या गोष्टीवरून सतत चिंतेत होतात ती चिंता तुमची या आठवड्यात दूर होईल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत पगारवाढीची संधी मिळेल. तसेच, तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून प्रगल्भता जाणवेल. शिक्षण, अध्ययनाशी संबंधित सुद्धा तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी येणारा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्या प्रोफेशन लाईफमध्ये चांगले सकारात्मक बदल पाहायला मिळतील.
जे युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना यश मिळेल. जे तरूण लग्नाचे आहेत त्यांना या आठवड्याच्या शेवटापर्यंत शुभवार्ता मिळू शकते. ज्यांना नोकरीत बदली करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेताना घरातील ज्येष्ठांबरोबर आधी चर्चा करा. जे व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्या व्यवसायात येणारे पैसे कुठून येतात, वाईट मार्गाने तर येत नाहीत ना याची खात्री करून घ्यावी. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, तुमचं मन थोडं विचलित होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा चांगले परिणाम देणारा असणार आहे. या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला तु्मचे खर्च वाढू शकतात. या खर्चावर नियंत्रण ठेवा. तसेच, व्यवसाय करणाऱ्या लोकांनी आजूबाजूला लक्ष न देता आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करावं. तसेच, तुम्ही वाहन चालवताना काळजी घ्या. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी 10 वेळा विचार करा.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमची कामे नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने पार पाडताना दिसतील. या आठवड्यात एखाद्या चांगल्या मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने काही मोठे काम पूर्ण होऊ शकते.परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे.आठवड्याच्या मध्यात तुम्हाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.तुम्ही लेखन आणि संशोधन कार्यात सहभागी असाल तर तुम्हाला विशेष यश मिळणे शक्य आहे.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाणार आहे. या आठवड्यात या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहावे लागेल. त्याच वेळी, मकर राशीच्या लोकांसाठी त्यांची ऊर्जा आणि पैशाचे व्यवस्थापन करणे चांगले होईल, अन्यथा त्यांना आठवड्याच्या उत्तरार्धात अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.तुमचा जमीन किंवा इमारतीशी संबंधित वाद असेल तर आठवड्याच्या पूर्वार्धात त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी दिलासादाय असणार आहे.या आठवड्यात तुम्हाला जीवनाशी संबंधित काही मोठ्या अडचणींपासून आराम मिळू शकेल.व्यवसायाशी संबंधित लोकांना त्यांच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यास त्यांना समाधान वाटेल. कुंभ राशीच्या लोकांना आठवड्याच्या पूर्वार्धात सरकारकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात घाईगडबडीत कोणतेही काम करणे टाळावे.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप आनंद आणि यश मिळवून देईल. आठवड्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला अनेक गोष्टींशी संबंधित चांगली बातमी मिळेल. तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुम्ही अगदी अवघड कामेही सहज आणि वेळेत पूर्ण करू शकाल. नोकरदार लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून पूर्ण आशीर्वाद मिळेल.या काळात, टीमवर्कमध्ये काम करून, तुम्ही एक मोठा प्रकल्प अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :