Weekly Horoscope 6 May to 12 May Lucky Zodiacs : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा असणार आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून परदेशात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होईल, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. पालकांसोबतचे संबंध उत्तम राहतील आणि वैवाहिक जीवनासाठी हा काळ उत्तम आहे.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. महिलांना कुटुंबात मान-सन्मान मिळेल आणि कार्यालयातही त्यांची प्रतिष्ठा वाढेल. या आठवड्यात तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेले गैरसमज दूर होतील, वैवाहिक जीवनात आनंद राहील.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान असेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करू शकता. या आठवड्यात तुम्ही तुमच्या सुखसोयींशी संबंधित गोष्टींवर पैसे खर्च करू शकता. तुमच्या अहंकाराला कोणत्याही कामात ढवळाढवळ करू देऊ नका. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्तम राहील. या आठवड्यात तुम्ही करिअर आणि व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करू शकता. या आठवड्याच्या प्रवासात तुम्हाला नवीन लोक भेटतील, जे तुमच्या भविष्यात उपयोगी पडतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. तुमच्या प्रिय जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल. आरोग्याची काळजी घ्या.
धनु रास (Sagittarius)
नवीन आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी शुभदायी ठरेल. कार्यालयातील वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. नोकरीत चांगली संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे काम लोकांना आवडेल. नोकरदार महिलांच्या दर्जात वाढ होईल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या मार्गात येणारे अडथळे या आठवड्यात दूर होताना दिसतील. व्यावसायिकाला अपेक्षित नफा मिळू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :