Weekly Horoscope 20-26 May 2024 : मे महिन्याचा चौथा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. वृश्चिक आणि मकरसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांना येत्या आठवड्यात आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला अपेक्षित यश मिळवायचं असेल तर तुमची ऊर्जा वाया जाऊ देऊ नका. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहील. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या भरात घेऊ नका.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होईल, यामुळे तुमचं मन आनंदी होईल. या आठवड्यात तुम्ही कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला सर्व कामांत कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यात भाऊ आणि मित्रांसोबत काही विषयांवर चर्चा होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत लाभेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. तुमच्या वडिलांची तब्येत खालावली असल्यामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणं टाळा.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र परिणाम घेऊन येईल. या आठवड्यात तुम्हाला सुखसुविधांचा तितका लाभ घेता येणार नाही. व्यवसायात अपेक्षित नफा मिळूनही अडथळ्यांना सामोरं जावं लागेल, यामुळे तुमची चिंता वाढू शकते. एखाद्याच्या सहकार्याने तुमचं एखादं सरकारी काम पुढे सरकेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध प्रस्थापित करणं टाळा. वैवाहिक जीवन सुखाचं जाण्यासाठी एकमेकांना वेळ द्या.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा थोडा व्यस्त असणार आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा भार तुमच्यावर राहील. तुम्ही कमिशनवर काम करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी भाग्याचा असेल. घरात नवीन पाहुण्याचं आगमन झाल्यामुळे या आठवड्यात आनंदाचं वातावरण राहील. व्यवसायाशी संबंधित कोणतेही मोठे निर्णय घेणं टाळा. एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो भावनेच्या भरात घेऊ नका, विचारपूर्वक घ्या.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला बॉसच्या पुढे-मागे करण्यात, त्याला खुश ठेवण्यात व्यस्त राहतील.  या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, त्यामुळे तुम्ही समाधानी राहाल. आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसाय चांगला चालेल. प्रेम प्रकरणात यश मिळेल आणि विवाहितांना त्यांच्या मुलांकडून प्रेम मिळेल. आठवड्याच्या मध्यात खर्च वाढतील. आरोग्य बिघडेल. तुम्ही अधिक भावूक व्हाल. आरोग्य नाजूक राहील, पण आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अनेक समस्या देखील भेडसावतील. व्यवसायात निराशा येऊ शकते. लव्ह लाईफमध्ये अडचणी येतील.


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा ठरेल. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. बराच काळ अडकलेला सरकारी पैसा परत मिळू शकेल. कोणाशीही बोलत असाल तेव्हा आवाज सौम्य ठेवा, नाहीतर परिस्थिती बिघडू शकते. या आठवड्यात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. या आठवड्यात तुमचे छंद जोपासण्यावर तुमचा अधिक पैसा खर्च होऊ शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Chanakya Niti : लग्नाआधीच जोडीदाराला विचारा 'हे' 3 प्रश्न; नाहीतर लग्नानंतर होईल संताप, चाणक्य सांगतात...


Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या