Vidur Niti : महाभारतातील (Mahabharat) कौरव आणि पांडवांचे मामा विदुर यांना अत्यंत विद्वान मानले गेले जाते. त्यांचे शत्रू देखील त्याच्या विद्वत्तेचा आणि न्यायप्रेमाचा आदर करत असत. महात्मा विदुर हे दासीचे पुत्र असले तरी त्यांना हस्तिनापूरचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ते महाराज युधिष्ठिराचे सल्लागार देखील होते. महाराज आपल्या सर्व महत्त्वाच्या निर्णयांबाबत विदुरचा सल्ला घेत असत. या सर्व सल्ल्यांना विदूर नीती असे म्हटले जाते. 


विदुर नीती हे हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र आणि महात्मा विदुर यांच्यातील संवाद आणि संभाषणांचे संकलन आहे. महाभारताच्या निकालाची भविष्यवाणी कणारे विदुर हे पहिले व्यक्ती होते. महाराजा धृतराष्ट्र यांनी देखील सांगितले होते की या युद्धाचा परिणाम भयानक असेल. म्हणूनच महात्मा विदुरांनी महाराज धृतराष्ट्र यांना ते थांबवण्याची खूप विनंती केली होती. त्यांच्या विदुर नीतीला आजच्या काळात देखील खूप महत्व आहे. 


विदुर सांगतात की,  इतरांवर टीका करणारे लोक अविश्वासून असतात. अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नये, अन्यथा फार मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. विदुरजी म्हणतात की जो व्यक्ती इतरांची निंदा करतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवता येत नाही.


जेव्हा महाराजा धृतराष्ट्राने विदुराला इतरांवर टीका करणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल विचारले, त्यावेळी विदुरजी म्हणाले की, असे लोक जे इतरांची निंदा करतात, ज्यांचा समोर निंदा करतात त्यांचा निषेध करतात. असे लोक कोणाचेही नातेवाईक असू शकत नाहीत. अशा लोकांवर विश्वास ठेवण्यालायक अनसतात.


 जे लोक इतरांवर टीका करतात ते नात्यात शंका  निर्माण करतात. लोकांमध्ये वाद निर्माण करून त्यांना राज्य करायचे आहे. अशा लोकांना ना समाजाकडून मान मिळतो ना त्यांना कोणी पसंत करतं. विदुरजी म्हणतात की, जो माणूस आपल्या जवळच्या मित्र आणि नातेवाईकांची पुन्हा पुन्हा परीक्षा घेतो व त्यांची सत्यता तपासतो, अशा व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नये, अन्यथा तुनचे नुकसान होऊ शकते, असे विदुर नीतीमध्ये सांगितले आहे.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या


Chanakya Niti : असे कर्मचारी ऑफिसमध्ये सगळ्यांना प्रिय असतात, कोणतीही समस्या क्षणार्धात सोडवतात, चाणक्य म्हणतात..