Shani Dev : शनिवार हा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. पौराणिक ग्रंथांमध्ये शनिवार हा शनिदेवाला समर्पित वार आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना शुभ फळ देतात, अशी श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की या दिवशी पूजा केल्याने शनिदेवाचा क्रूरपणा कमी होतो आणि जीवनातील शनिदेवाशी संबंधित समस्या दूर होतात.
शनि अशुभ असल्यास काय होते?
शनि देव अशुभ असेल तर जीवनात अनेक संकटे येतात. शिवा त्याची अवकृका झाली तर व्यक्तीला आपल्या कामात यश मिळत नाही. पैसा, करिअर आणि वैवाहिक जीवनात गंभीर समस्या निर्माण होतात. जवळच्या नातेवाईकांशी संबंध बिघडतात, रोज नवनवीन समस्या उद्धभवतात. याबरोबरच व्यक्ती मानसिक तणावाने घेरली जाते. व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो, शत्रू वर्चस्व गाजवू लागतात. एखाद्या व्यक्तीने नवीन काम सुरू केले तर नुकसान होते. या सर्व संकटातून बाहेर निघण्याचा देखील अशा वेळी मार्ग दिसत नाही. परंतु, काही उपाय केल्याने शनिच्या या त्रासापासून मुक्तता मिळते.
पंचांगनुसार 26 नोव्हेंबर 2022 रोजी शनिवार आहे. हा दिवस मार्गशिर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. या दिवशी चंद्र धनु राशीत असेल. यासोबतच वृश्चिक राशीमध्ये तीन ग्रहांचा संयोग होईल. या राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र हे ग्रह असतील. मकर राशीत शनिचे संक्रमण असेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनिला मकर राशीचा स्वामी म्हणून वर्णन केले आहे. विशेष म्हणजे 26 नोव्हेंबरला शनि स्वतःच्या राशीत बसणार आहे. जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या घरात असतो तेव्हा तो शुभ मानला जातो. म्हणूनच असे म्हणता येईल की हा शनिवार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी एक शुभ योग आहे.
या 5 राशीच्या लोकांनी 'शनि पूजा' करावी
यावेळी शनीची 5 राशींवर विशेष दृष्टी आहे. या राशींवर शनीची साडेसाती साडेसाती चालू आहे. ज्योतिषीयशास्त्रानुसार, धनु, मकर, कुंभ, मिथुन आणि तुळ राशीवर शनिची साडेसाती सुरू आहे. त्यामुळे या पाच राशीच्या लोकांनी तर शनिवारी शनिची पूजा करावीच. असे केले तर शनिच्या साडेसातीतून मुक्तता मिळू शकते.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा
शनि मंदिरात शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा.
शनी चालिसा आणि शनि मंत्रांचा जप करा.
शनिशी संबंधित वस्तूंचे दान करा.
कुष्ठरुग्णांची सेवा करा.
शनिवारी काय करू नये?
नियम आणि शिस्त मोडू नका.
गरीब आणि कष्टकरी लोकांना त्रास देऊ नका.
इतरांची फसवणूक करू नका.
लोभ टाळा.
इतरांवर टीका करणे टाळा.
रागावू नका आणि गर्विष्ठ होऊ नका.
जे कष्ट करतात त्यांचा अपमान करू नका, त्यांचे मन दुखवू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या