Chanakya Niti : व्यक्तीचे जीवन सोपे करण्यासाठी आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी आपल्या धोरणांमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्याच्या मदतीने माणूस आयुष्यातील मोठी समस्या सोडवण्यात यशस्वी होतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये सांगितले आहे की, कोणत्या प्रकारची व्यक्ती कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला आवडते. कोणत्या प्रकारची व्यक्ती कामाच्या ठिकाणी यश मिळवू शकते. चाणक्य (Chanakya Niti) सांगतात की, मेहनतीसोबतच आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी व्यक्तीने या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.


सर्वांना सोबत घेऊन ऑफिसमध्ये काम करतात


आचार्य चाणक्य सांगतात की, जे लोक सर्वांना सोबत घेऊन ऑफिसमध्ये काम करतात आणि त्यांना कोणाचाही हेवा वाटत नाही, अशा लोकांना प्रत्येक कामात यश नक्कीच मिळते. अशी लोकं सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यासोबतच सर्वांना सोबत घेतल्यास अवघड कामही सोपे करतात. यासोबतच टीमचे मनोबलही वाढवितात. म्हणून असे लोक कामाच्या ठिकाणी सर्वाना प्रिय असतात.


सहकाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय काहीच शक्य नाही


आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या लोकांमध्ये कामाच्या ठिकाणी सर्वांना सोबत घेण्याची भावना असते. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. सर्वांसोबत एकत्र काम केल्याने काम जलद होतेच, परंतु प्रत्येक सदस्याला आव्हानांवर मात करण्याची कला शिकण्यास देखील मदत होते. सबका साथ, सबका विकास ही भावना असणारे लोक ऑफिसमध्ये सगळ्यांनाच आवडतात, कारण या लोकांमध्ये inferiority complex नसतो. त्यांच्या कामात अडचण आल्यावर ते घाबरत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा आहे. 


आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना पूर्ण सन्मान द्या
आचार्य चाणक्यांच्या धोरणानुसार टीमच्या सहकार्याशिवाय कोणतेही लक्ष्य साध्य करता येत नाही. कोणाच्या मदतीशिवाय तुम्ही यश मिळवू शकत नाही. कोणतेही मोठे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर टीममधील सहकारी एकत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. सोबत येण्यासाठी त्यांचा आदर करणे फार महत्वाचे आहे. तरच तुम्ही तुमची कामे पूर्ण करू शकता. चाणक्य म्हणतात की सर्वांचा आदर केल्यास प्रगतीचा मार्ग खुला होईल.


लोकांना प्रोत्साहित करा
आचार्य चाणक्य म्हणतात की, जेव्हा तुम्हाला उच्च पद आणि अधिकार मिळतात तेव्हा त्याचा अभिमान बाळगू नका, तर प्रतिभावान व्यक्तीला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्याकडे प्रतिभा आहे ते आदरास पात्र आहेत. कामाची जबाबदारी वाटून घेतल्यास काम लवकर होऊन व्यवस्थित पूर्ण होईल. त्याच वेळी, जे लोक प्रतिभावान व्यक्तीची प्रतिभा दाबण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःचे भविष्य खराब करतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या


Numerology : 'या' तारखेला जन्मलेले लोक धनसंपत्तीच्या बाबतीत असतात खूप भाग्यवान, सदैव असतो कुबेराचा आशीर्वाद