(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : घरातील नकारात्मक दूर करण्यासाठी करा 'हा' सोपा उपाय; सुख-समृद्धी नांदेल, आर्थिक समस्याही सुटतील
Vastu Tips : ज्योतिषशास्त्रात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे घरात सकारात्मकता येते, राहू-केतू दोषांपासून मुक्ति मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. कापराशी संबंधित या उपायांबद्दल जाणून घेऊया.
Camphor Remedies : जेव्हा आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा असते, त्यावेळी आपली प्रत्येक कामं बिघडू लागतात, प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात. नकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या घराला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो, अशा घरात कधी पैसा टिकत नाही. कधी-कधी जन्मकुंडलीतील राहू-केतूच्या स्थितीमुळे देखील आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.
ज्योतिषशास्त्रात सर्व समस्यांवर कापूर हा रामबाण उपाय मानला जातो. कापूराच्या उपायामुळे घरातील आर्थिक स्थिती सुधारते. तुमची कामं वारंवार बिघडत असतील तर कापराशी संबंधित काही उपाय (Remedies) अवश्य करून पहा.
या उपायाने राहू-केतू दोषापासून मिळेल आराम
जर तुमची कामं सतत बिघडत असतील किंवा तुम्ही पुन्हा-पुन्हा आजारी पडत असाल तर तुमच्या कुंडलीवर राहू-केतूचा अशुभ परिणाम असू शकतो. राहू-केतू दोष दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर घ्यावा आणि तो शुद्ध गाईच्या तुपात बुडवावा. यानंतर घरात रोज संध्याकाळी कापूर जाळावा आणि सर्व दिशांमध्ये न्यावा. या उपायामुळे तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील.
घरात दोन वेळा कापूर जाळावा
सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळावा. घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहतं. इतकंच नाही तर घरातील नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते. कापूर जाळल्याने घरात सुख-शांती राहते.
कापूर जाळण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी
कापूरने आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे. घराबाहेरील सर्व कचरा डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे, त्यानंतरच घरी कापूर आरती करावी, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते.
या उपायाने वास्तू दोष होतात दूर
घरातील वास्तु दोष दूर करण्यासाठीही कापूर वापरला जातो. यासाठी एका भांड्यात कापूरचे काही तुकडे घ्यावे, वास्तुदोष असलेल्या ठिकाणी हे तुकडे ठेवा. एक कापूर संपल्यानंतर तिथे कापूरचे नवीन तुकडे ठेवा, हा उपाय काही दिवस सतत करत राहा. कापूरशी संबंधित हे उपाय वास्तु दोष दूर करतात.
या उपायाने पितृदोष किंवा कालसर्प दोष होतो दूर
जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा कालसर्प दोष देखील कापूरच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो. यासाठी सकाळ, संध्याकाळ आणि रात्री तीन वेळा घरात कापूर जाळावा. कापराशी संबंधित हे उपाय केल्याने राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते.
कामातील अडथळे होतील दूर
कामात वारंवार अडथळा येत असेल तर शनिवारी कापराशी संबंधित एक उपाय करावा. यासाठी अंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाका आणि आता या पाण्याने अंघोळ करा, असं केल्यास शनिदोष दूर होतो. कापूरच्या या उपायाने तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात, त्याच बरोबर देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद लाभतो.
या नकारात्मक शक्ती होईल दूर
झोपताना वाईट स्वप्न पडत असतील उशीखाली कापूर ठेवून झोपावं, यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल आणि घरातून नकारात्मक शक्तीही निघून जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Vastu Tips : घराच्या दारावर 'ही' गोष्ट लावा; आर्थिक समस्या होतील दूर ; शनिदोषापासूनही मिळेल आराम