Vastu Shashtra : बेडरूममध्ये कधीही लावू नका अशा प्रकारचे चित्र, पती-पत्नीमध्ये वाढतो वाद
Vastu Shashtra : बेडरूमच्या वास्तूचाही पती-पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो. बेडरूमची सजावट करताना विशेष लक्ष दिले पाहिजे. काही चित्रे पती-पत्नीमधील तणाव वाढवण्याचे काम करतात.

Vastu Shashtra : वास्तुशास्त्रामध्ये (Vastu Shashtra) घरात ठेवलेल्या वस्तूंचे विशेष महत्त्व आहे. घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. ज्यामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीवर परिणाम होतो. वास्तूनुसार घरात लावलेल्या चित्रांचाही घरातील ऊर्जेवर विशेष प्रभाव पडतो. बेडरूममध्ये कोणतेही पेंटिंग किंवा चित्र ठेवताना विशेष काळजी घ्यावी.
या पेंटिंगचा पती-पत्नीच्या नात्यावर वाईट परिणाम होतो.
कधी-कधी आपण बेडरूममध्ये अशी पेंटिंग्ज ठेवतो, जी सुंदर दिसते पण वास्तुशास्त्रानुसार ती योग्य मानली जात नाहीत. वास्तूनुसार या पेंटिंगचा पती-पत्नीच्या नात्यावर वाईट परिणाम होतो. जाणून घ्या बेडरूममध्ये कोणत्या प्रकारची पेंटिंग्ज वापरू नयेत.
बेडरूममध्ये चुकूनही अशा पेंटिंग लावू नका
बेडरुममध्ये भूत, नकारात्मक किंवा पिशाच्चाशी संबंधित कोणतेही पेंटिंग कधीही ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढते. जर तुम्ही बेडरूममध्ये असे पेंटिंग ठेवले असेल तर ते लगेच काढून टाका.
-वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये युद्धाचे चित्र लावू नये. अशी पेंटिंग घरातील समस्या वाढवण्याचे काम करतात. असे चित्र लावल्याने पती-पत्नीमधील भांडणे वाढतात असे मानले जाते.
-बेडरूममध्ये एकाच प्राण्याची किंवा माणसाची पेंटिंग लावू नये. त्यामुळे एकटेपणा निर्माण होतो. वास्तूनुसार बेडरूममध्ये अग्नीचा फोटोही लावू नये.
-आग हे विनाशाचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की हे बेडरूममध्ये ठेवल्याने पती-पत्नीमध्ये रागाची भावना वाढते.
-दिवंगत पूर्वजांचे फोटो देखील बेडरूममध्ये लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये अशी चित्रे पती-पत्नीच्या मनात अशांती निर्माण करतात. पूजेच्या खोलीच्या ईशान्य कोपऱ्यातील भिंतीवर पूर्वजांची चित्रे लावावीत.
-बेडरूममध्ये पाण्याच्या घटकाचा फोटो लावणे देखील टाळावे. असे मानले जाते की यामुळे पती-पत्नीच्या नात्यात स्थिरता येत नाही. मात्र, ही चित्रे बेडरूमच्या उत्तरेकडील भिंतीवर लावता येतात.
-जंगली प्राणी तुम्हाला खूप प्रिय असतील, पण बेडरूममध्ये त्यांची पेंटिंग किंवा कोणताही फोटो लावू नका. त्यांच्या प्रभावामुळे पती-पत्नीमध्ये रागाची भावना वाढते. म्हणूनच बेडरूममध्ये अशी चित्रे लावणे टाळावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Vastu Tips : घरात नांदेल सुख-समृद्धी! केवळ वास्तूच्या 'या' छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
