Vastu Tips For Plant: तणाव दूर ठेवेल, करिअरमध्ये यश मिळेल, अनेक फायदे देणारं ‘हे’ रोप घरात असायलाच हवं!
Vastu Tips For Plant : घरात रोपे लावल्याने वातावरण शुद्ध होतेच, पण अनेक वास्तुदोषही दूर होतात. छोटी छोटी रोपं लावल्याने घरातील वातावरण आल्हाददायक होते.
Vastu Tips For Plant: घरामध्ये छोटी छोटी रोपं लावल्याने घरातील वातावरण आल्हाददायक होते. रोपे लावल्याने वातावरण शुद्ध होतेच, पण अनेक वास्तुदोषही दूर होतात. वास्तुशास्त्रात अशा अनेक वनस्पतींचा उल्लेख आहे, ज्या आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्यासोबतच सुख-समृद्धी देखील प्रदान करतात. यातील काही रोपं आपल्याला निरोगी तर ठेवतातच, शिवाय घराची शोभा देखील वाढवतात. तर, हीच रोपं आपल्या आजूबाजूला तणावमुक्त वातावरणही निर्माण करतात. अशाच रोपांमधील एक रोप आहे ‘स्नेक प्लांट’. चला तर, जाणून घेऊया हवा शुद्ध करणाऱ्या आणि तणाव दूर ठेवणाऱ्या या रोपाचे अनेक फायदे..
‘स्नेक’ वनस्पती फायदे
* घरात ‘स्नेक प्लांट’ लावलेच पाहिजे. हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पतींमध्ये याचे नाव अग्रक्रमी आहे. यासोबतच या रोपामुळे तणाव कमी होऊन, मानसिक शांती मिळवण्यातही मदत होते. ही वनस्पती जीवनातील अनेक अडथळ्यांपासून आपले रक्षण करते, असे मानले जाते.
* ‘स्नेक प्लांट’ घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात, पूर्व किंवा दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते. मात्र, हे रोप कुठेही ठेवले तर, एकटे ठेवा. जर त्याच्या बाजूला इतर रोपं असतील तर, हे रोप घरात नकारात्मक ऊर्जा आणू शकते.
* स्नेक प्लांट बेडरूम किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवल्यास घरात सुख-समृद्धी येते. हे रोप लिव्हिंग रूममध्ये ठेवणार असाल, तर अशा ठिकाणी ठेवा जिथे ते घरात येणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेस पडेल.
* अभ्यासात मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी हे रोप स्टडी रूममध्ये ठेवणे शुभ मानले जाते. हे स्नेक प्लांटचे रोप बुक शेल्फवर किंवा अभ्यास करत असलेल्या टेबलावर ठेवू शकता.
* जर, तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर, तुमच्या कामाच्या ठिकाणी टेबलवर हे रोप ठेवा. त्यामुळे कार्यक्षमतेला गती मिळते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात.
‘या’ वनस्पतीदेखील फायदेशीर
अशोक : घराबाहेर अशोकाचे झाड लावल्याने शोक दूर होते, असे म्हटले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि बंधुभाव वाढतो. जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
लेव्हेंडर : घरात लेव्हेंडरसारखे जांभळ्या रंगाचे रोप लावणे शुभ मानले जाते. ही वनस्पती दिसायला जितकी सुंदर आहे, तितकेच त्याचे अनेक गुणधर्मही आहेत. या रोपामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि त्याचा सुगंध मनाला शांती देतो. यामुळे घरही तणावमुक्त राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :