Vastu Tips : दु:ख, संकट, आर्थिक चणचण होईल दूर; फक्त मोरपंखाचा 'असा' करा वापर, वाचा 6 सोपे उपाय
Vastu Tips For Peacock Feather : हिंदू धर्मात मोरपंखाला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्रात याच्याशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत.
![Vastu Tips : दु:ख, संकट, आर्थिक चणचण होईल दूर; फक्त मोरपंखाचा 'असा' करा वापर, वाचा 6 सोपे उपाय Vastu Tips For Peacock Feather use these simple 6 remedies for happy life marathi life Vastu Tips : दु:ख, संकट, आर्थिक चणचण होईल दूर; फक्त मोरपंखाचा 'असा' करा वापर, वाचा 6 सोपे उपाय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/13/b6551a87c95459c8021d3a2f09c5ab7d1723536866189358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vastu Tips For Peacock Feather : ज्योतिष शास्त्रात, मोरपंखाला (Peacock Feather) फार शुभ मानलं जातं. मोरपंख भगवान श्रीकृष्णाला देखील फार प्रिय आहे. भगवान श्रीकृष्णाच्या (Lord Krishna) मुकुटावर देखील मोरपंख आहे. तसेच, पूजेच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही अनेकदा मोरपंख ठेवलेला पाहिलेला असेल. पण, तुम्हाला माहीत आहे का, मोरपंखाचे अनेक प्रकारचे उपाय करता येऊ शकतात. आणि हे उपाय फार साधे, सोपे, योग्य आणि परिणामकारक असू शकतात. हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे बदल होऊ शकतात. हे उपाय नेमके कोणते आहेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
1. धन-लाभासाठी हा उपाय करा
जर तुम्हाला धनलाभाची गरज असेल तर त्यासाठी काळा धागा तुमच्या पर्सला बांधून ठेवा. असं केल्याने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते. तसेच, यामुळे तुमचं कोणतं नुकसानही होणार नाही.
2. वाईट स्वप्न पडत असतील तर...
जर तुम्हाला रात्री भीतीदायक स्वप्न येत असतील तर त्यावर उपाय म्हणून तुम्ही तुमच्या बेडखाली मोरपंख ठेवून झोपू शकता. असं केल्याने तुम्हाला कधीच वाईट स्वप्न येणार नाहीत.
3. मोरपंखाचा असाही उपयोग
मंदिराच्या साफसफाईसाठी तुम्ही नेहमी मोरपंखाचा उपयोग करु शकता. त्याचबरोबर पितृंचा फोटोदेखील साफ करण्यासाठी तुम्ही मोरपंखाचा वापर करु शकता. यामुळे तुम्हाला पितरांचा चांगला आशीर्वाद मिळू शकतो.
4. तुमच्या आयुष्यात सुख येईल
जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या बेडरुममध्ये मोरपंख नक्कीच लावू शकता. यामुळे तुमच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा टिकून राहील. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन देखील चांगलं राहील.
5. शत्रूचा नाश करण्यासाठी...
मोरपंखावर भगवान हनुमानाच्या चरणांचा शेंदूर घेऊन त्यावर तुमच्या शत्रूचं नाव लिहा तसेच, ते रात्री मंदिरात ठेवा. तसेच, दुसऱ्या दिवशी त्याला पाण्यात सोडून द्या. यामुळे तुमच्या शत्रूचा नाश होईल.
6. राहुला खुश करण्यासाठी
लांब मोरपंखाच्या दांड्यावर जर तुम्ही एक सुपारी अर्पित करा आणि त्यावर गंगाजल शिंपडावं. त्यानंतर रां राहवे नम: या मंत्राचा 21 वेळा जप करा. असं केल्याने राहुचं शुभ फळ तुम्हाला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Raksha Bandhan 2024 : 18 की 19 ऑगस्ट? यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नेमका कधी? यंदाही राहणार भद्राचं सावट? वाचा A To Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)