Vastu Tips : घरातील वास्तूकडे दुर्लक्ष करणे हे संकटाला आमंत्रण देणारे मानले जाते. अनेक वेळा घाईगडबडीत आपण घरातील अनेक वस्तू योग्य ठिकाणी ठेवायला विसरतो. परंतु, या एका चुकीमळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तूनुसार काही वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्यामुळे घरातील सुख जावू शकते. वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तूला योग्य दिशा आणि स्थान दिले आहे. त्याचप्रमाणे घराच्या वाहनांच्या चाव्या ठेवण्यासाठी योग्य जागाही सांगितली आहे. त्या घरात घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतील. परंतु, चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास अडचणी येवू शकतात.    


 दुकानाच्या चाव्या किंवा कोणत्याही वाहनाच्या चाव्या ठेवताना यांची जागा बदलली जाते. परंतु, अशा चाव्या नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला ठेवाव्यात. असे केल्याने घरात समृद्धी राहते आणि मानसिक गोंधळापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर लॉकर किंवा प्रॉपर्टीच्या चाव्या नैऋत्य दिशेला ठेवाव्यात. परंतु, चाव्या घरात कधीही आग्नेय कोनात ठेवू नका.


या चुका करू नका


कधी-कधी आपण मंदिरात चाव्या ठेवतो. पण असे करणे शुभ नसते. कारण चाव्या सतत घाण होत राहतात. लोक ते कधीच धुत नाहीत. अशा प्रकारे पूजेच्या ठिकाणी घाणेरड्या चाव्या ठेवल्यास नकारात्मक परिणाम दिसून येतात. 


काही लोक देवाच्या फोटोजवळ चावी ठेवतात. पण चाव्या ठेवण्यासाठीची अशी ठिकाणे टाळा, कारण चाव्या वारंवार हात घाण होत राहतात. त्यामुळे आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :