Numerology : अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे, ज्यामध्ये प्रभुत्व मिळविण्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत. ज्यांना आकड्यांची माहिती असते त्यांना लोकांचे वर्तन समजायला फारसा वेळ लागत नाही. कारण त्यांना आकड्यांचा खेळ माहित असतो. जन्मकुंडलीमध्ये सर्व आडव्या आणि कर्ण रेषांमध्ये लिहिलेल्या संख्यांद्वारे  आपल्या जीवनातील अडचणी, त्रास किंवा प्रगती आणि अधोगतीबद्दल अंदाज बांधले जातात. आज आम्ही तुम्हाला मुल्यांका चारमध्ये जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगणार आहोत.


मुल्यांक चार 


4, 13 किंवा 22 तारखेला जन्मलेल्या लोकांची मुल्यांक संख्या चार आहे. राहू हा मुल्यांक चार असलेला मूळ राशीचा ग्रह आहे. ज्याचा थेट संबंध भगवान सूर्यदेवांशी आहे. या लोकांवर सूर्यदेवाची कृपा दिसून येते.


मुल्यांक चारच्या लोकांचे वागणे  


मुल्यांक चारमध्ये जन्मलेल्या लोकांचे भविष्य खूप उज्ज्वल असते. त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या स्वार्थाची जाणीव असते. इतरांकडून काम करून घेण्याची त्यांच्यात चांगली हातोटी असेत. हे लोक खूप श्रीमंत आणि संपन्न असतात. देवी लक्ष्मीची कृपा सदैव त्यांच्यावर राहते, तसेच त्यांना प्रसिद्धी आणि मान-सन्मान मिळतो. ऐश्वर्यसंपन्नतेमुळे ते स्वभावाने खूप गर्विष्ठ असतात. लोकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे किंवा त्यांच्या कोणत्याही कामात सहकार्य करणे त्यांना आवडत नाही. ते स्वभावाने खूप स्वार्थी असतात. शिवाय त्यांना फक्त लोकांशी त्यांचे काम होईपर्यंत संबंध ठेवण्येच महत्वाचे वाटते.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :