Samudra Shastra : समुद्र शास्त्रामध्ये माणसाच्या शरीराचे विविध भाग स्पष्ट केले आहेत. या अवयवांमध्ये व्यक्तीचे डोळे, नाक, कान, ओठांपासून तळपायापर्यंतच्या अवयवांचा समावेश आहे. आज आपण ओठांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही कसे जाणून घेऊ शकतो याबाबत जाणून घेऊया.


गुलाबी ओठ : ज्या व्यक्तीचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे लाल असतात तो भाग्यवान असतो. या लोकांना त्यांच्या कामाचा मान मिळतो.


लाल ओठ : असे लोक छोट्या-छोट्या गोष्टींवरून खूप उत्तेजित होतात. हे लोक लिखनात खूप पारंगत असतात. कधीकधी ते नियमाच्या बाहेर काम करतात.


लहान ओठ : असे लोक खूप संवेदनशील असतात. योग्य संधी पाहूनच ते नेहमी आपला शब्द पाळतात. मेहनती असूनही त्यांना पुरेशी प्रगती करता येत नाही.


बाहेर आलेले ओठ : या लोकांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. हे लोक इतरांकडून मदत घेण्यावर खूप विश्वास ठेवतात. हे लोक वाईट व्यसनाच्या आहारी जाण्याची दाट शक्यता असते.


मोठे ओठ : हे लोक सहसा इतरांकडून आदर मिळविण्यासाठी भुकेलेले असतात. त्यांना एकाच वेळी अनेक गोष्टी करायला आवडतात. हे लोक खूप हुशार असतात.


जाड ओठ : अशा लोकांना नेहमीच आर्थिक चणचण भासते. त्यांचे नाव सहजपणे वादांशी जोडले जाते. हे लोकही हट्टी असतात.


गुळगुळीत ओठ : अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात सर्व प्रकारचे आनंद मिळतात. असे लोक खूप भाग्यवान असतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :