Vastu Tips : झाडं घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणतात. वास्तूनुसार घरामध्ये किंवा घराच्या आवारात योग्य दिशेने झाडं लावल्यास घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते. याशिवाय तुमचे आरोग्यही सुधारते, पण दिशेसोबतच तुम्ही घरात किंवा आवारात कोणती झाडं लावत आहात हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही लोक घरात अशी झाडं लावतात, ज्याचा विपरीत परिणाम त्यांना पुढे भोगावा लागतो. घरात नेमकी कोणती झाडं (Plants) लावावीत? जाणून घेऊया.


मोहिनी वृक्ष : मोहिनीला इंग्रजीत Crassula आणि Jade Plant या नावाने ओळखले जाते. हे रोप घरात लावल्याने घरात सुख-शांती नांदते. तसेच जर तुमच्या घरातील वातावरण तणावपूर्ण असेल तर तुम्ही घरात मोहिनीचे रोप अवश्य लावा.


स्नेक प्लांट​ : खूप प्रयत्न करूनही प्रगती होत नसेल तर घरामध्ये स्नेक प्लांट​ रोप नक्कीच लावावं. स्नेक प्लांट​ लावल्याने करिअरमध्ये प्रगती होते. जर तुमचे करिअर बिघडलं असेल किंवा तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन मिळत नसेल, तर तुमच्या स्टडी टेबलवर किंवा कामाच्या टेबलावर स्नेक प्लांट​ ठेवा.


मनी प्लांट : या वनस्पतीचं नाव पैशाशी जोडलेलं आहे, त्यामुळे मनी प्लांट लावल्याने जीवनात आर्थिक प्रगती होते. याशिवाय जर तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर तुम्ही घरात मनी प्लांट लावा, अडकलेले पैसेही तुम्हाला मिळतील.


तुळशी : शुभ वृक्ष आणि वनस्पतीमध्ये तुळशीचे नाव प्रथम येते. हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे. असे मानले जाते की, ज्या घरात तुळशीचे रोप असेल तिथे कधीही पैशाची कमतरता नसते. तुळशीच्या रोपामुळे घरातील नकारात्मक दोष दूर होतात. घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावू नका नाहीतर अशुभ परिणाम होतील. तुळशीचे रोप नेहमी ईशान्य दिशेला लावावे. दररोज स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे.


शमी : ज्योतिषशास्त्रात शमी वनस्पतीचा संबंध शनि ग्रहाशी असल्याचे मानले जाते. शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर या झाडाची नियमित पूजा करा. वास्तू शमीनुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला काही अंतरावर शमीचे झाड लावावे. झाडाची सावली घरावर पडणार नाही अशा पद्धतीने लावावी.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Unlucky Plants for Home : घरात कधीही लावू नका 'हा' वेल; खिसा नेहमी राहील रिकामा, नवरा-बायकोमध्ये कायम होतील भांडणं