Unlucky Plants for Home : वास्तुनुसार घरात झाडं लावणं शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रामध्ये काही झाडं आणि वनस्पतींबद्दल सांगण्यात आलं आहे, जे घरात लावल्यास घरी सुख-समृद्धी नांदते. काही रोपं लावल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात आणि ग्रह दोषांपासूनही मुक्ती मिळते. ही झाडं घरात लावल्याने घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.


परंतु वास्तुशास्त्रात (Vastu Tips) अशा काही झाडांचाही उल्लेख करण्यात आला आहे, जी घरात लावल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात नकळत चुकीची झाडं लावल्यास त्याचे तुम्हाला अशुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. ही झाडं (Plants) घरात लावल्याने आर्थिक अडचणी येतात, शिवाय आरोग्याच्या समस्याही निर्माण होतात. 


घरात चुकूनही लावू नका 'या' भाजीचा वेल


आजकाल बहुतेक लोकांना घरातील बागकामाची आवड असते. त्यांना घरामध्ये भाज्या आणि फळांची झाडं-वेली लावायला आवडतात. पण वास्तुशास्त्रानुसार काही भाज्यांची झाडं घरात लावू नयेत. यात पहिलं नाव कारल्याच्या वेलीचं येतं. घरामध्ये कारल्याची वेल चुकूनही लावू नये, असं सांगितलं जातं. यामागचं कारण नेमकं काय? जाणून घेऊया.


कारल्याची वेल लावल्याने दिसतात वाईट परिणाम


कारल ही कडू भाजी आहे आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा देखील नकारात्मक असते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही कारल्याचा वेल लावू नये, असं सांगितलं जातं. हा वेल लावल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतात आणि व्यक्तीला याचे अशुभ परिणामही पाहायला मिळू शकतात.


घरात नेहमी राहील पैशांची कमी


वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये कारल्याचं रोप लावल्याने घरावर आर्थिक संकट येतं. घरात कारल्याचं रोप लावल्याने आपली आर्थिक स्थिती ढासळते, कर्जाशी संबंधित समस्येलाही सामोरं जावं लागू शकतं. या सर्व गोष्टींमुळे घरातील सुख-शांति भंग होते.


लक्ष्मी टिकत नाही


घरामध्ये कारल्याचं रोप लावल्याने माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. लक्ष्मीची नाराजी वाढल्याने तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.  तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यावर कर्जही वाढू शकतं.


आरोग्यावरही होतो परिणाम


कारल्याच्या रोपातून निघणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते. तुम्ही सतत आजारी पडू शकता किंवा जखमी देखील होऊ शकता.


प्रतिष्ठेला पोहोचू शकतो धक्का


घरामध्ये कारल्याचं रोप लावल्याने एखाद्या व्यक्तीच्या मान-सन्मानावरही परिणाम होऊ शकतो. तुमच्या प्रतिष्ठेलाही हानी पोहोचू शकते. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी काही कारणांमुळे तुम्हाला अपमान सहन करावा लागू शकतो, तुमच्याबद्दल काही अफवा पसरवल्या जाऊ शकतात.


मग कारल्याची वेल नेमकी लावावी तरी कुठे?


आता हा प्रश्नही अनेकांच्या मनात येत असेल की, कारल्याचं रोप घरी लावता येत नसेल, तर हे रोप नेमकं लावायचं तरी कुठे? तर, कारल्याचा वेल हा घराबाहेर लावता येतो. जर तुमच्याकडे बागकामासाठी घराबाहेर बाग असेल किंवा छोटी रिकामी जमीन असेल तर तिथे तुम्ही कारल्याचं रोप लावू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की हे रोप घराच्या दक्षिण दिशेला कधीच लावू नये. यामुळे घरातील सदस्य कधीच सुखी नसतात आणि घरात नेहमी कलह निर्माण होतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला बनले दुर्मिळ योग; महादेवाच्या कृपेने 'या' 5 राशींचे लोक होणार समृद्ध; कमावणार बक्कळ पैसा