Yodha Movie Trailer Launch : सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) मुख्य भूमिकेत असलेल्या योद्धा (Yodha) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी थ्रिलिंग अंदाजात योद्धा चित्रपटाचे पोस्ट रिलीज करण्यात आले होते. 37,000 फूट उंचावरुन हे पोस्टर लॉन्च झाले होते. तसेच आता हटके अंदाजात योद्धा चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. थेट विमानातून आणि प्रेक्षकांच्या समवेत योद्धा चित्रपटाचा हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. तसेच 15 मार्च रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात सैनिकाच्या भूमिकेत असणार आहे. अरुण असं या सिद्धार्थच्या भूमिकेचं नाव आहे. देशासाठी स्वत:चा त्याग करणारा असा हा योद्धा आहे. मागील अनेक दिवसांपासून योद्धा या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. याआधी हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण त्यावेळी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. पण आता हा चित्रपट 15 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सिनेसृष्टीत पहिलाच प्रयोग
चित्रपटांच्या संदर्भात सिनेसृष्टीत अनेक नवनवीन प्रयोग केले जातात. बऱ्याचदा चित्रपटांचे प्रमोशन देखील वेगळ्या पद्धतीने केले जाते. पण पहिल्यांचा एका चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत अनोख्या पद्धतीने लॉन्च करण्यात आला आहे. विमानात प्रेक्षकांसोबत 37,000 फूट उंचावरुन हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. यासंदर्भात सिद्धार्थ मल्होत्रा याने सोशल मीडियावर या ट्रेलर लॉन्चचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच बॉलीवूड किंबहुना भारतीय सिनेसृष्टीतला हा पहिलाच प्रयोग असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
सिद्धार्थ मल्होत्रासोबत योद्धामध्ये झळकरणार 'हे' कलाकार
'योद्धा' या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासह दिशा पटानी (Disha Patani) आणि राशी खन्ना (Raashii Khanna) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. करण जोहर, शशांक खेतान, अपूर्व मेहता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अॅक्शन आणि रोमांचचा या चित्रपटात धमाका असल्याचं यापूर्वी सिद्धार्थने सांगितलं होतं. त्याच पद्धतीने आता योद्धाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे.