Vasant Panchami 2024 : माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा (Vasant Panchami ) उत्सव साजरा केला जातो. वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वही वेगळे आहे. पंचमी तिथी 14 फेब्रुवारीला असून हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आरधनेला समर्पित असतोय. वसंती पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत.
वसंती पंचमीच्या दिवशी विद्येच्या साधनेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरस्वती देवीची आराधना केली जाते. ही आराधना करण्यासाठी शुभफल प्राप्त होण्यासाठी या दिवशी काही खास कामे सांगितली आहेत.
वसंत पंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी?
- वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करावे
- पिवळी कपडे परिधान करावीत
- त्यानंतर पिवळ्या आसनावरच बसून सरस्वतीची पूजा करावी
- पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुले वापरावी
- वसंत पंचमीला 108 पिवळी फुले वाहिल्याने विशेष लाभ मिळतो
- सरस्वती स्तोत्राचे पठण करावे
- सर्व प्रकारचे ऐश्वर्य, ज्ञान, विद्या, बुद्धी यांच्या प्राप्तीसाठी वसंत पंचमीचे पर्व शुभ मानले जाते
वसंत पंचमीच्या दिवशी आई वडिलांनी मुलांसाठी करण्याचे उपाय?
- या दिवशी सरस्वती प्रकट झाल्याची पौराणिक मान्यता आहे
- ॐ ह्रीं ऐं ह्रीं सरस्वत्यै नमः। या मंत्राचा जप करावा
- या दिवशी वही, पुस्तके, लेखणी यांचे पूजन शुभ मानले जाते.
- या पुजनामुळे स्मरण शक्ती चांगली होते.
- सरस्वतीच्या पुजेमध्ये केशर आणि पिवळ्या फुलांचा वापर होतो.
- ज्योतिष शास्त्रानुसार या वस्तूंचा उपयोग गुरुला प्रसन्न करण्यासठी केला जातो.
- यामुळे ज्ञान आणि धनवृद्धी होते. वसंत पंचमीच्या पुजेला बुंदीचा प्रसाद अर्पण करण्याची पद्धत आहे.
- विद्यारंभ करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
- वसंत पंचमीच्या दिवशी श्री सरस्वती देवी पूजन सर्व विद्यार्थ्यांनी करावे.
- आई वडिलांनी मुलाच्या जिभेवर ऐं हा मंत्र सोन्याच्या काडीने किंवा बोटाने मधात बुडून काढावे.
- तसेच विद्यार्थ्यांनी ऐं मंत्राचा ऐं मंत्राचा जप करावा.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)