Rahul Vaidya Disha Parmar Daughter First Pic:  बॉलिवूडचा  गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) यांनी अखेर त्यांच्या लेकीचा चेहरा दाखवला आहे. राहुल आणि दिशा  हे नुकतेच एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्यावेळी त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा दाखवला. चिमुकली नव्या वैद्य ही तिची आई दिशाच्या मांडीवर दिसली होती. सध्या या गोड लेकीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.






एअरपोर्टवर झाले स्पॉट 


दिशा परमार आणि राहुल वैद्य यांच्या मुलीचा हा फोटो एका चाहत्याने त्याच्या एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये नवीन विमानतळावर पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली होती आणि तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिच्या डोक्यावर गुलाबी रंगाचा बँड लावण्यात आला होता. नव्याने पायात गुलाबी शूज घातले आहेत. राहुल आणि दिशाची मुलगी नव्याचे हे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. 






दिशा परमारही मुलीसोबत दिसली स्टायलिश लूकमध्ये 


लेकीसोबतच्या फोटोंमध्येही दिशाही अतिशय स्टायलिश लूकमध्ये होती. तिने काळ्या टॉपसह आर्मी ग्रीन कलरची ट्राउझर्स घातली होती. राहुल वैद्य हा काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्ससह निळा ब्लेझर परिधान केलेला अतिशय डॅशिंग दिसत होता.


दिशा परमारने 20 सप्टेंबर 2023 रोजी मुलीला जन्म दिला. महिनाभरानंतर  नामकरण सोहळा पार पाडला. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव नव्या असे ठेवले आहे. या सोहळ्यातील अनेक छायाचित्रेही या जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. मात्र, त्यात चेहरा दाखवण्यात आला नाही. 


राहुल आणि दिशाचे बिग बॉसमध्ये जुळले होते सूत


राहुल वैद्यने केवळ आपल्या आवाजाने सर्वांनाच वेड लावले नाही तर तो टीव्ही रिॲलिटी शो बिग बॉसच्या सीझन 14 मध्ये देखील दिसला होता. या शोमध्येच त्याने दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्याच्या प्रपोजलला उत्तर देण्यासाठी दिशा स्वतः शोमध्ये आली होती आणि तिने राहुलला होकार दिला होता. शोचा हा सीझन 'टीव्ही बॉस लेडी' रुबिना दिलाकने जिंकला होता. राहुल आणि रुबिना यांच्यात या शोमध्ये खूप वादही दिसून आले.