Ratha Saptami 2024 Date: रथ सप्तमी (Ratha Saptami) हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी रथ सप्तमी शुक्रवारी 16 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो. पद्म पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने सात महापापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो. रथ सप्तमीलाच सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथावर बसला होता. जाणून घेऊया रथ सप्तमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत.
कधी आहे रथसप्तमी?
पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी १५ फेब्रुवारीला सकाळी 10.12 मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.54 मिनिटांनी समाप्त होईल. मात्र उदयतिथी शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी असल्याने त्याच दिवशी रथ सप्तमी साजरी होणार आहे.
रथ सप्तमी 2024 मुहूर्त?
16 फेब्रुवारीला रथ सप्तमीचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 17 मिनिटे आणि सकाळी 6 वाजून 59 मिनिटांपर्यत आहे. सूर्योदय सकाळी 6.59 वाजता होणार आहे. स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. रथ सप्तमीच्या दिवशी स्नान करण्याचा शुभ मुहूर्त 1 तास 42 मिनिटांचा आहे
ब्रह्म योग आणि भरणी नक्षत्रात रथ सप्तमी
रथ सप्तमीच्या दिवश ब्रह्म योग आणि भरणी नक्षत्र आहे, ब्रह्म योग पहाटेपासून दुपारी 3 वाजून 18 मिनिटांपर्यंक आहे. त्यानंतर इंद्र योग सुरू होईल. तसेच भरणी नक्षत्र पहाटेपासून सकाळी 8.47 पर्यंत आहे. त्यानंतर कृतिका नक्षत्र आहे,
रथसप्तमी दिवशी पूजा आणि व्रताचे महत्त्व
रथसप्तमी दिवशी स्नान, पूजा,दान या गोष्टींना विशेष महत्व आहे. या दिवशी सुर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. तसेच रोग आणि इतर आजारापासूनही मुक्ती मिळते असे म्हणतात. रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व असते. तुम्हाला जमेल तसे दान करा. अन्नदान, धान्यदान,वस्त्रादान करा. रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावे. असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्ती वाढते, म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)