Tulsi Vivah 2024 : तुलसी विवाहानंतर सुरू होणार लगीन सराई; पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले मार्च 2025 पर्यंतचे विवाह मुहूर्त
Tulsi Vivah 2024 : कार्तिकी एकादशीनंतर आता घराघरांत शुभ कार्यांना सुरुवात होईल. सर्वत्र लगीन घाई पाहायला मिळेल. याच पार्श्वभूमीवर पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी विवाहाचे शुभ मुहूर्त सांगितले आहेत.
Vivah Shubh Muhurat 2024 : वैदिक पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशीला तुळशी विवाह (Tulsi Vivah) साजरा केला जातो. यंदा तुळशी विवाह 13 नोव्हेंबरला, बुधवारी सुरू होणार आहे. 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरे केले जातील. त्यानंतर माणसांच्या विवाह सोहळ्यांना सुरुवात होईल. कपडे, सोने-चांदीची बाजारपेठ मंगल कार्यासाठी सजलेली दिसेल. तुळशी विवाहानंतर सुरू होणाऱ्या विवाह मुहूर्तांबद्दलची (Vivah Muhurat 2025) माहिती पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.
मार्च 2025 पर्यंतचे विवाह मुहूर्त
नोव्हेंबर 2024 | डिसेंबर 2024 | जानेवारी 2025 | फेब्रुवारी 2025 | मार्च 2025 |
17 | 3 | 16 | 3 | 1 |
22 | 5 | 17 | 4 | 2 |
23 | 6 | 19 | 7 | 3 |
25 | 7 | 21 | 13 | 6 |
26 | 11 | 22 | 16 | 7 |
27 | 12 | 26 | 17 | 12 |
14 | 20 | 15 | ||
15 | 21 | |||
20 | 22 | |||
23 | 23 | |||
24 | 25 | |||
26 |
विवाह मुहूर्तांचं महत्त्व
हिंदू विधींमध्ये विवाह खूप महत्त्वाचा आणि पवित्र विधी मानला जातो. वैदिक शास्त्रानुसार, विवाह हे एक अतिशय पवित्र नातं असून, ते शुभ मुहूर्तावरच झालं पाहिजे. सर्व शुभ कार्यांसाठी शुभ मुहूर्त अन् वेळ, तारीख असते. लग्नासाठीही शुभ मुहूर्त आणि तारीख असते. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी शुभ वेळ आणि तारीख निश्चित करणं महत्त्वाचं आहे. कारण- विवाह म्हणजे एक मिलन आहे; जे दोन व्यक्तींना, तसेच दोन कुटुंबांना एकमेकांशी जोडते आणि आयुष्यभराच्या सुंदर नात्यात बांधते.
हेही वाचा: