Swami Samarth Quotes : स्वामी समर्थांच्या 'या' 10 अनमोल विचारांनी करा नववर्षाची शुभ सुरुवात; सर्व संकटांवर कराल मात, वाईट विचार आणि नकारात्मक गोष्टी राहतील दूर
Swami Samarth Thoughts : तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल तर तुम्ही स्वामी समर्थांचे हे 10 विचार वाचू शकता. यामुळे नक्कीच तुमचं जीवन बदलून जाईल.
Swami Samarth Quotes : श्री स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) अक्कलकोट महाराज (Akkalkot Maharaj) श्रीदत्तात्रयांचे अवतार मानले जातात. असंख्य लोक स्वामींची आराधना करतात, स्वामींना मानतात. त्यांना कायम वाटतं की, आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपार्शिवाद असावा. अडचणीच्या काळात कितीही संकटं आली तरी ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा दिलासा स्वामींनी अनेकांना दिला.
स्वामींना मानणारा मोठा भक्तगण त्यांच्या विचारांचे अनुसरण करतो. स्वत: स्वामी आपली पाठराखण करत आहेत, हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. अशक्यही शक्य करतील रे स्वामी, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि अशा वेळी तुम्ही स्वामींचे विचार हे विचार वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल.
श्री स्वामी समर्थांचे दहा विचार (Swami Samarth Thoughts Quotes)
अरे बाळा,
उदास असशील तर माझे नाव घे,
दु:खी असशील तर माझे ध्यान घे,
मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे,
एवाढ्याने समाधानी नसशील तर बाळ... अक्कलकोटची वाट घे
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका.
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरु नका.
यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे,
दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.
विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी.
तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता.
अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे
आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे
ही माझी जबाबदारी आहे.
अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल
उगाची भितोसी भय हे पळू दे,
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
तुला भीती वाटत असेल,
मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल,
तर डोळे बंद करुन माझे ध्यान कर,
अशाने तु माझ्याशी संवाद साधशील
कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग
माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे,
त्यापर्यंत नक्की पोहोचेल
विवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस,
ठाम राहा आणि ते कृतीत आण
हेही वाचा: