Surya-Shani Yuti : 2025 च्या सुरुवातीलाच शनी-सूर्य येणार आमने-सामने; 'या' 3 राशींचं रातोरात उजळेल भाग्य
Surya-Shani Yuti 2025 : शनी-सूर्य जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा त्याचा प्रभाव अनेक राशींवर होतो. यामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळतात तर काही राशींवर अशुभ परिणाम मिळतात.
Surya-Shani Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यदेवाला (Sun) ग्रहांचा राजा म्हटलं जातं. तर, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, शनी आणि सूर्य यांच्यात पिता-पुत्राचं नातं आहे. मात्र, तरीही सूर्य-शनीमध्ये शत्रूत्वाचं नातं आहे. त्यामुळेच, शनी-सूर्य जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा त्याचा प्रभाव अनेक राशींवर (Zodiac Signs) होतो. यामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळतात तर काही राशींवर अशुभ परिणाम मिळतात.
एकाच राशीत होणार सूर्य-शनीची युती
2025 वर्षाच्या सुरुवातीला सूर्य-शनीची युती होणार आहे. या दिवशी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनी देव आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे सूर्य-शनी कुंभ राशीतच विराजमान असणार आहेत. या संक्रमणाने 3 राशींच्या लोकांना चांगला लाभ होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
सूर्य-शनीच्या संक्रमणाने मेष राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. तसेच, तुम्ही या काळात जुने कर्ज फेडणं गरजेचं आहे. शनी-सूर्याच्या संक्रमणाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या लवकर संपतील. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनी- सूर्याची युती तुमच्यासाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. तसेच, तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे.समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. घरातील वातावरण आनंदी असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष फार शुभकारक ठरणार आहे. या वर्षात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, कामानिमित्त तुम्ही केलेल्या यात्रा फार यशस्वी ठरतील. वैवाहिक जीवन चांगलं असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची चांगली साथ लाभेल. तसेच, आरोग्याच्या बाबतीतही तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: