Surya Double Rajyog : ज्योतिषशास्त्रात सूर्य हा सूर्य हा सर्वात महत्त्वाच्या ग्रहांपैकी एक मानला जातो. सूर्याच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. सूर्य दर महिन्याला आपली रास बदलतो. सूर्य सध्या कुंभ राशीत आहे. 1 फेब्रुवारीला सूर्य शुक्र आणि नेपच्यूनसोबत मीन राशीत 45 अंशात असेल, त्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होत आहे. सूय दोन ग्रहांसोबत 45 अंशात असल्याने दुहेरी अर्धकेंद्र योग तयार होत आहे, ज्याचा भरपूर लाभ काही राशीच्या लोकांना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वैदिक पंचांगानुसार, 1 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी सूर्य शुक्रासोबत अर्ध केंद्र योग निर्माण करेल आणि संध्याकाळी 7 वाजून 59 मिनिटांनी सूर्य नेपच्युनसोबत अर्ध केंद्र योग तयार करेल. शुक्र आणि युरेनस हे दोन्ही ग्रह सध्या मीन राशीत आहेत.
वृषभ रास (Taurus)
सूर्याने तयार केलेला अर्धकेंद्र योग वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायद्याचा ठरेल. या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांपासून आराम मिळू शकतो. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्ही कामात अधिक लक्ष देऊ शकाल, दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या आता दूर होऊ शकतात. नोकरदार लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळू शकतं. नोकरीत प्रगतीसोबतच बोनस मिळण्याचीही शक्यता असते. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. तुमची लव्ह लाईफ चांगली असणार आहे.
कर्क रास (Cancer)
या राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग अनुकूल ठरू शकतो. सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंदी आनंद पसरेल आणि या काळात तुमचा मान-सन्मान वेगाने वाढू शकतो. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्ही करत असलेल्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता. या काळात अध्यात्माकडेतुमचा अधिक कल असेल. तुमचं आरोग्यही ठणठणीत राहील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी दुहेरी योग खूप भाग्याचा ठरेल. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं या काळात पूर्ण होऊ शकतात. शुभ कार्य पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुम्ही करत असलेल्या कामात यश मिळेल. यासोबतच जे स्वत:चा व्यवसाय चालवत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी स्वीकारलेली नवीन धोरणं फायद्याची ठरतील. तुमची पैसे कमावण्याची क्षमता वाढेल आणि तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: