Kuber Dev Favorite Rashi : वैदिक ज्योतिषशास्त्रात 12 राशी आणि 27 नक्षत्रांचं वर्णन आढळतं. तसेच या राशींचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी आणि देवाशी संबंधित मानला जातो. उदाहरणार्थ, मकर आणि कुंभ शनिदेवाशी संबंधित मानले जातात. सिंह राशीचा संबंध सूर्य देवाशी समजला जातो. त्याचप्रमाणे अशा काही राशी देखील आहेत, ज्यांचा संबंध कुबेर देवाशी आहे, या राशींवर कुबेर देवाचा विशेष आशीर्वाद असतो. तसेच या लोकांना भगवान कुबेरांच्या कृपेने सर्व भौतिक सुख प्राप्त होतं. तसेच हे लोक खूप श्रीमंत होतात. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ रास कुबेर देवाची आवडती आहे. या राशीवर कुबेर देवाचा विशेष आशीर्वाद असतो. या लोकांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होतं. हे लोक पैसे कमावण्यात तरबेज असतात. तसेच, हे लोक अनेक स्त्रोतांतून पैसे कमवतात. हे लोक रोमँटिक असतात. ते थोडे मजेदार देखील आहेत. या लोकांना कुबेराच्या कृपेने धनाची प्राप्ती होते. तसेच, हे लोक मेहनती आणि समर्पित असतात.


धनु रास (Sagittarius)


कुबेर देवाला धनु रास देखील प्रिय आहे. या राशीचे लोक भाग्यवान असतात. हे लोक आपल्या कष्टाने आयुष्यात भरपूर पैसा कमावतात. याशिवाय हे लोक खूप मेहनती आणि प्रामाणिक असतात. तसेच कुबेराच्या कृपेने त्यांना सर्व भौतिक सुख प्राप्त होतं, ते चैनीचे जीवन जगतात. हे लोक पैसे वाचवण्यात निष्णात असतात. हे लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात. हे लोक व्यावहारिक असतात. तसेच, कुबेराच्या कृपेने यांना हवी ती प्रत्येक गोष्ट मिळते.


तूळ रास (Libra)


तूळ ही देखील भाग्यवान राशींपैकी एक आहे, कारण या राशीच्या लोकांवर देखील कुबेर देवाची कृपा आहे. या राशीचे लोक खूप श्रीमंत असतात. तसेच या लोकांना कुबेराच्या कृपेने जीवनात खूप मान-सन्मान मिळतो. हे लोक जीवनात भरपूर सुखसोयींचा आनंद घेतात. तसेच, या लोकांना काळजी घेणारा आणि रोमँटिक जोडीदार मिळतो. हे लोक आपल्या आयुष्यात भरपूर संपत्ती कमावतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Mangal Gochar : 24 फेब्रुवारीपासून 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; मंगळ चालणार सरळ चाल, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार