Bank Holidays in February 2025 मुंबई: जानेवारी महिन्याचे शेवटचे काही दिवस बाकी आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी राहणार हे जाणून घेणं आवश्यक आहे. बँकांमधील विविध कामांचं नियोजन पुढच्या महिन्यात करणार असाल तर तुम्हाला बँकांचं कामकाज किती दिवस सुरु असेल, कोणत्या दिवशी सुट्टी असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा आहे. या 28 दिवसांच्या कालावधीत बँकांना कामकाज करण्यासाठी देखील पूर्ण दिवस मिळत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं फेब्रुवारी महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार याची यादी जारी केली आहे. तुम्ही देखील तुमच्या शहरात कोणत्या दिवशी बँक बंद राहणार अन् कोणत्या दिवशी सुरु राहणार हे पाहायला हवं.
फेब्रुवारीमध्ये 14 दिवस बँका बंद राहणार
फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद असतील हे तुम्ही पाहू शकता. याशिवाय रविवार आणि दुसऱ्या अन् चौथ्या शनिवारी बँकेच्या कामकाजाला सुट्टी देखील असते.
फेब्रुवारीमधील सु्ट्ट्यांची यादी :
3 फेब्रुवारी (सोमवार) : सरस्वती पूजनाच्या निमित्तानं अगरताळामध्ये बँक बंद राहील.
11 फेब्रुवारी (मंगळवार) : थाई पूसामच्या निमित्तानं चेन्नईत बँका बंद असतील.
12 फेब्रुवारी(बुधवार) : श्री रविदास जयंती निमित्तानं शिमला येथे बँका बंद असतील.
15 फेब्रुवारी (शनिवार) : लुई-नगाई-नी निमित्तानं इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल.
19 फेब्रुवारी (बुधवार) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बेलापूर, मुंबई, नागपूरमध्ये बँकांना सुट्टी राहील.
20 फेब्रुवारी (गुरुवार) : अरुणाचल प्रदेश, मिझोरम राज्य स्थापना दिनानिमित्त ऐझवाल, इटानगरमध्ये बँका बंद असतील.
26 फेब्रुवारी (बुधवार ): महाशिवरात्रीनिमित्त अहमदाबाद, ऐझवाल, बंगळुरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम मध्ये बँका बंद असतील.
28 फेब्रुवारी (शुक्रवार) : लोसार निमित्त गंगटोकला बँका बंद असतील.
यासह साप्ताहिक सुट्टीनिमित्त बँका बंद असतील
2 फेब्रुवारीला रविवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी असेल.
8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीला दुसरा शनिवार अन् रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.
16 फेब्रुवारीला रविवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी असेल.
22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारीला चौथ्या शनिवार अन् रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.
इतर बातम्या :