Budh Shani Yuti : तब्बल 30 वर्षांनंतर शनि आणि बुधाची युती; 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्समध्ये घसघशीत वाढ
Budh Shani Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारीमध्ये ग्रहांचा राजकुमार बुध कुंभ राशीत उदय होणार आहे. तर शनि आधीच कुंभ राशीत स्थित आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा स्थितीत, फेब्रुवारीमध्ये कुंभ राशीत शनि आणि बुधाची युती होईल. यामुळे 3 राशींचं नशीब उजळू शकतं. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मकर रास (Capricorn) : शनि आणि बुधाची युती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. तुमच्या आयुष्यात आनंदाचा बहार येईल. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होण्यासोबतच संपत्तीतही वाढ होऊ शकते.
या काळात सासरच्यांशी तुमचे संबंध सुधारतील. यासोबतच तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्ही चांगली कामं कराल. आळस दूर होऊ शकतो.
मिथुन रास (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीची युती शुभ ठरू शकते. तुमचं आरोग्य ठणठणीत राहील. यासोबतच घरच्यांशी संबंध चांगले राहतील. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल.
या काळात न्यायालयीन खटल्यांमध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. यासोबतच आर्थिक स्थितीही चांगली राहणार आहे. जीवनात आनंद येऊ शकतो.
मेष रास (Aries) : बुध आणि शनीची युती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. अविवाहित लोकांसाठी हा काळ चांगला आहे, तुम्हाला लग्नाचे चांगले प्रस्ताव मिळू शकतात. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील.
तुमची पैशांची अडचण दूर होईल. परंतु या काळात तुमचा अनावश्यक खर्च देखील होईल. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. लांबचा प्रवास करता येईल, यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. नोकरीत सर्वांचे सहकार्य लाभेल.