एक्स्प्लोर

Makar Sankranti : मकर संक्रांतीला बनला चतुर्थ दशम योग; मेषसह 'या' 5 राशींचं नशीब उजळणार, सूर्यदेव करणार कृपावृष्टी

Makar Sankranti Shubh Yog :आज मकर संक्रांतीच्या दिवशी रवियोग, वरियान योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचा दिवस मेष राशीसह इतर पाच राशींसाठी शुभ असणार आहे.

Makar Sankranti : मकर संक्रांतीचा आजचा दिवस शुभ आहे. आज (15 जानेवारी) चंद्र मीन राशीत प्रवेश करणार असून सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे आज मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी सूर्य आणि गुरु एकमेकांपासून चतुर्थ आणि दशम भावात राहणार आहेत, ज्यामुळे आज सूर्य आणि गुरूचा चौथा दशम योग तयार होत आहे. याशिवाय आज चतुर्थ दशम योगासह रवियोग, वरियान योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने मकर संक्रांतीच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ योग तयार झाल्याने 5 राशींना लाभ होणार आहे, या 5 राशींबद्दल जाणून घेऊया.

मेष रास

15 जानेवारीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी असणार आहे. आज मकर संक्रांती असल्यामुळे मेष राशीचे लोक धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेतील, धार्मिक कार्यात रस घेतील. नफा मिळवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये आज तुम्हाला चांगलं यश मिळेल आणि तुमच्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होईल. कुटुंबातील वाद आज संपुष्टात येतील. तुमचं तुमच्या आईसोबतचं नातं चांगलं राहील आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर तिची साथ मिळेल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा मकर संक्रांतीचा दिवस लाभदायक असणार आहे. कन्या राशीचे लोक आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुम्हाला तंदुरुस्त वाटेल, तसेच तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींकडेही विशेष लक्ष द्याल. या राशीचे लोक जे नवीन नोकरीसाठी तयारी करत आहेत, त्यांना आज एखाद्या मित्राच्या मदतीने चांगली ऑफर मिळू शकते, जी तुमच्या करिअरसाठी उत्तम ठरेल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळालाही भेट देऊ शकता.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस म्हणजे मकर संक्रांती उत्तम असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना नशीब पूर्ण साथ देईल आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहील आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीतील लोकांना आज त्यांच्या अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते त्यांचं काम वेळेवर पूर्ण करू शकतील आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवतील. व्यापारी आणि व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला आज चांगला नफा मिळू शकेल, ज्यामुळे तुमची चांगली प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही इतर काही नवीन व्यवसायातही गुंतवणूक करू शकता.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा चांगला दिवस असणार आहे, कारण सूर्य तुमच्या राशीत भ्रमण करणार आहे. मकर राशीच्या लोकांवर महादेवाची कृपा असल्याने अपूर्ण कामं आज पूर्ण होतील आणि त्यांच्या करिअरला गती मिळेल. तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर तुम्ही तो पुढे नेण्यास सक्षम असाल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांचा त्यांच्या भागीदारांशी चांगला समन्वय असेल आणि नफा मिळवण्याच्या शुभ संधी मिळतील. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या भावना प्रियकरासमोर व्यक्त करू शकाल. मकर संक्रांतीमुळे तुमचा अध्यात्मिक कार्यांकडे अधिक कल असेल आणि धार्मिक कार्यात अधिक रस घ्याल.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच 15 जानेवारीचा दिवस लाभदायक असणार आहे. मीन राशीचे लोक आज गुंतवणुकीचा विचार करत असतील किंवा जमीन आणि वाहन खरेदी करायचं असेल तर, मकर संक्रांतीचा दिवस खूप शुभ राहील. महादेवाच्या कृपेने अचानक परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होऊ लागेल. त्याच वेळी, काही व्यावसायिक सौदे आज व्यापाऱ्यांना मोठा नफा देतील, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झालं तर, तुमचे तुमच्या जोडीदारासोबत काही मतभेद झाले असतील तर ते आज संपुष्टात येतील आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही एकत्र पूजापाठ कराल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : 2024 मध्ये शनि 'या' जन्मतारखेच्या लोकांवर बारीक नजर ठेवणार! काळजी घ्यावी लागणार, अंकशास्त्रानुसार जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget