Surya Gochar : 24 तासांच्या आत ग्रहांचा राजा सूर्याचं संक्रमण; 'या' 4 राशींना मिळणार कर्माचं फळ, काऊंटडाऊन सुरु
Surya Gochar 2024 : 16 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी ठिक 7 वाजून 41 मिनिटांनी सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश होईल. सूर्य या राशीत एक महिन्यापर्यंत असणार आहे.
Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्याचं संक्रमण (Surya Gochar 2024) होणार आहे. 16 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी ठिक 7 वाजून 41 मिनिटांनी सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश होईल. सूर्य या राशीत एक महिन्यापर्यंत असणार आहे. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजून 19 मिनिटांनी सूर्याचा धनु राशीत प्रवेश होईल. यामुळे कोणत्या राशींवर (Zodiac Signs) कसा परिणाम होणार ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे मेष राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागेल. तसेच, व्यवसायात देखील तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल. नोकरीच्या बाबतीत तुम्हाला समाधान मिळणार नाही. तर, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हे राशी परिवर्तन अशुभ ठरण्याची शक्यता आहे. या एक महिन्याच्या काळात तुम्हाला एखादी अशुभ वार्ता ऐकायला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूपच चिंतेत असाल. तसेच, तुमच्याकडे पैशांची कमतरता असल्या कारणाने गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाहीत. या काळात तुम्ही तुमच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्याचं हे संक्रमण फार कठीण ठरु शकतं. या काळात नोकरदार वर्गातील लोकांनी आपल्या रागावर संयम ठेवण्याची गरज आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाबाबत शंक व्यक्त केली जाऊ शकते. तसेच, आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचं हे संक्रमण फार आव्हानात्मक ठरू शकतं. या काळात तुमचा बॅंक बॅलेन्स कमी होईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तणाव जाणवू शकतो. तर, उत्पन्नाचे सोर्स कमी होऊ शकतात. तुम्हाला मित्रांकडून पैशांची मदत मागावी लागू शकते. त्यामुळे या काळात विनाकारण पैसे खर्च करु नका. आणि आरोग्याची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :